आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर'चा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उल्कानगरीवॉर्ड क्रमांक ९८ मध्ये ज्ञानेश्वरनगर, उल्कानगरी, मित्रविहार कॉलनी, खिंवसरा पार्क, कासलीवाल विश्व, तिरुपती एक्झिक्युटिव्ह, आदित्यनगर, वेलकमनगर, सहयोगनगर आदी भागांचा समावेश होतो. या वॉर्डाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी नसल्याने अनेक भागांना ग्रॅव्हिटी पाइपलाइनने पाणीपुरवठा केला जातो, तर मित्रविहार आणि खिंवसरा पार्कला फक्त जयविश्वभारती कॉलनीतील पाण्याच्या टाकीवरून पुरवठा होतो. या भागाला तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होतो. पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने येथील नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. "समांतर'चा कारभार ‘ईस्ट इंडिया कंपनीसारखा’ असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या वॉर्डात अधिकृत नळ कनेक्शन हजार ६३५ आहेत, तर ३०० अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. वॉर्डाला दररोज चार टप्प्यांत पाणी सोडण्यात येते. समांतरकडे पाणीपुरवठा गेल्यापासून या वॉर्डातील पाण्याचा दाब आणि वेळ कमी झाला आहे. मनपाकडे पुरवठा व्यवस्था असताना नागरिकांना मुबलक पाणी मिळत होते. मात्र, समांतर आल्यापासून दररोज टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. उल्कानगरी वॉर्डाला दोन व्हॉल्व्हमन पुरवठा करतात. वॉर्डात अजून एका व्हॉल्व्हमनची आवश्यकता आहे. आधी एक ते दीड तास पुरवठा होत असे, अाता होत नाही.

मुख्य अडचण मुख्य उपाय....
या वॉर्डाची मुख्य अडचण म्हणजे इमारती होय. त्यामुळे पाणी वरपर्यंत पोहोचतच नाही. तसेच पाण्याची वेळदेखील कमी झालेली आहे. नवीनपाइपलाइन टाकणे आवश्यक आहे. संपूर्ण वॉर्डाला जर जलकुंभावरून पुरवठा सुरू केला, तर मुबलक पुरवठा होईल.

समान पाइपलाइन टाकावी
मनपानेदर महिन्याला काहीही काम करणाऱ्या समांतरला कोटी द्यायचे कशाला, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. वेळेवर पाणीपट्टी भरूनही मोठी गैरसोय होत आहे. या वॉर्डात १५ वर्षे जुनी २०० एमएमची मुख्य पाइपलाइन असून त्यावरून १००, १५० एमएमच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. याऐवजी एकसमान पाइपलाइन टाकली तर ही समस्या कमी होऊ शकते. ज्या ठिकाणी उतार आहे, त्या घरांना जास्त दाबाने पाणी मिळते.

पाइपलाइन बदलण्याशिवाय पर्याय उरला नाही
यावॉर्डात इमारतीच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर सोडाच; पण ग्राउंड फ्लोअरलादेखील पाणी मिळत नाही, याचे कारण येथील जुन्या पाइपलाइन आणि ग्रॅव्हिटी पाइपलाइनद्वारे केला जाणारा सप्लाय. यासाठी संपूर्ण वॉर्डात किमान २०० एमएमची पाइपलाइन टाकणे आवश्यक आहे.

या वॉर्डाचे माजी नगरसेवक आणि माजी महापौर संजय जोशी यांना याबाबत विचारले असता, समांतरने काहीही काम करता फक्त वसुली सुरू केलेली आहे. कंपनीने स्वत:चा एक रुपयाही गुंतवलेला नसून नागरिकांच्या पैशांचा चुराडा करण्याचे काम मात्र सुरू आहे. समांतरच्या लोकांना अनुभव नसल्याने नागरिकांच्या समस्यांकडे कंपनी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने पाण्याचे आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. समांतरने सर्वप्रथम नागरिकांना चांगले, स्वच्छ आणि किमान तास पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

तसेच विद्यमान नगरसेवक दिलीप थोरात म्हणाले, या वॉर्डात पाच-सहा ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी मी समांतरच्या अधिकाऱ्यांच्या खूप मागे लागलो, पत्रव्यवहार केला. मात्र, ते लोक दाद देत नाहीत.
काय म्हणतात नगरसेवक

२,६६५ अधिकृतनळ
३००अनधिकृतनळ

मेंटेनन्सदेखील नाही...
कोणत्याहीकामासाठी चांगले प्लॅनिंग (नियोजन) खूप आवश्यक असते. त्यानुसार काम केले तर कामातील अडथळे दूर केले जाऊ शकतात. मात्र, समांतरकडे नियोजनाचा अभाव असल्याने पाइपलाइन तर सोडाच; पण साधे मेंटेनन्सदेखील या लोकांना करता येत नसल्याचे दिसून येते.

नळांची स्थिती
तसेच या भागात समांतरकडून ५० ठिकाणी मीटर बसवण्यात आलेले आहेत.
आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो. वर आमच्या घरात एक थेंबही पाणी येत नाही, पाणीपट्टी वेळेवर भरूनदेखील हाल होतात. ही समस्या सोडवण्यात यावी. नीताजोशी, रहिवासी

पाणी कितीही काटकसरीने वापरले तरीदेखील पुरत नाही. याचे कारण करंगळीएवढी पाण्याची धार, त्यात पाणी कसे भरावे ? हीच मोठी समस्या आहे. शकुंतलालोणीकर, रहिवासी

मनपाकडे पाणीपुरवठा असताना पाणी मुबलक मिळत होते. आता पाण्याला दाब नाही, वेळही कमी आणि समांतर कशामुळे चांगली आहे, हे कळत नाही. मंजूषापिसे, रहिवासी

काय म्हणतात नागरिक
^आमच्याकडेमोटार लावल्याशिवाय एक थेंब पाणी येत नाही. समांतरला एवढे पैसे देऊनही काम होत नसेल, तर समांतरचे काम लगेच बंद करावे. विजेताकोरडे, रहिवासी