आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर चार प्रकारचे पाइप घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एचडीपीई पाइपच्या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत. यावर शासनानेच तोडगा दिला असला तरी प्रत्यक्षात समांतरकडून जायकवाडी ते शहरातील अंतर्गत पाइपलाइनच्या कामासाठी चार प्रकारचे पाइप वापरले जाणार आहेत. त्यामुळे पाइप खरेदीतून किती कोटींची आणि कुणाची बचत होईल हे लवकरच समोर येईल.

समांतरच्या कंत्राटदारांकडून शहरात अंतर्गत १५० किमी, तर जायकवाडीपासून फारोळा आणि नक्षत्रवाडीपर्यंत ५० किमीची मोठी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. मुख्य पाइपलाइनचे कंत्राटही दिलेे आहे. इतर पाइप वापराबाबत मनपात निश्चित झालेले नाही. कंपनीच्या वतीने शहरातील अंतर्गत पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले आहे. १८ किमीपर्यंतच्या कामासाठी डीआय पाइप खरेदी करण्यात आले आहेत. उर्वरित काम मनपाने पाइप खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यावरच होणार आहे. सध्याची पाइपलाइन पूर्णत: बदलली जाणार आहे. त्यासाठी चार प्रकारचे पाइप वापरले जातील. वेगवेगळ्या प्रकारानुसार व्यासानुसार त्याचे विभाजन करण्यात आले आहे.

या चार प्रकारांचा वापर होणार
मुख्य जलवाहिनीसाठी "एमएस माइल स्टील' ही दोन हजार व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे.
१२०० ते ३०० व्यासाच्या पाइपलाइनसाठी डीआय पाइप असतील. ही पाइपलाइन नक्षत्रवाडी ते शहरातील नव्याने बांधण्यात येणाऱ्या ३५ जलकुंभांपर्यंत असेल.
३०० ते १०० व्यासाच्या पाइपलाइनसाठी एचडीपीई पाइप वापरले जाणार आहेत.
घरगुतीसह सर्व प्रकारच्या नळ कनेक्शनसाठी एमडीपीई पाइप वापरले जाणार आहेत.

खरेदी प्रक्रिया सुरू
समांतरकडूनसंपूर्ण पाइपलाइनच बदलली जाणार अाहे. यासाठी चार प्रकारचे पाइप वापरण्यात येणार आहेत. तीन प्रकारचे पाइप खरेदीची प्रक्रिया पुढे सरकली आहे. अर्णबघोष, प्रकल्पसंचालक
दिव्य मराठी विशेष