आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

108 दिवसांत फक्त 7 पाइपची जोडणी, समांतर जलवाहिनीची कासवगती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरवासीयांना रोज पाणी मिळावे यासाठी ऑगस्ट २०१७ पर्यंत जायकवाडी ते नक्षत्रवाडी ही ४५ किमी अंतराची समांतर जलवाहिनी टाकण्याचे उद्दिष्ट औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी या कंपनीला दिलेले आहे. त्यानुसार समांतरचे कामही सुरू झाले. पण गेल्या १०८ दिवसांमध्ये या कंपनीने अवघ्या पाइप्सची जोडणी केली आहे. म्हणजेच फक्त ८४ मीटर जोडणी झाली आहे. पूर्ण अंतरात ३७५० पाइप जोडावे लागणार आहेत. कामाची हीच गती राहिली तर पाइपलाइन जोडणीचे काम पूर्ण होण्यास किमान १५ वर्षे लागतील. प्रत्यक्षात रोज किमान पाइप जोडले गेले, तरच हे काम वेळेत पूर्ण होईल. त्यासंदर्भात डीबी स्टारचा हा स्पेशल रिपोर्ट.
समांतर जलवाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला १७ सप्टेेंबर २०१५ रोजी सुरुवात झाली. त्याच दिवशी गुजरातमधून २५ पाइप आले होते. बिडकीन येथून कामाला सुरुवात झाली. डीबी स्टारने जानेवारी रोजी प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. आतापर्यंत यातील केवळ सात पाइपची जोडणी झाली आहे. एवढ्या मोठ्या अंतराच्या पाइप जोडणीसाठी फक्त दोन वेल्डर काम करत आहेत. सध्या जोडणी झालेल्या पाइपची संख्या आणि पूर्णत्वास जाण्यासाठी लागणाऱ्या पाइपची संख्या पाहिली, तर समांतरच्या कामाची गती लक्षात येईल.

२०१७ ची डेडलाइन
वाढत्याशहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने ऑगस्ट २०१७ पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याचे काम समांतरला दिले आहे. याबाबतच्या करारामध्येही वरील मुदतीबाबतचा मुद्दा स्पष्ट नमूद आहे. मात्र, १०८ दिवसांमध्ये अवघे पाइप जोडले गेले आहेत. म्हणजेच एका पाइपच्या जोडणीसाठी १५ दिवस लागत आहेत.

...तर लागतील १५ वर्षे
१०८दिवसांमध्ये अवघ्या सात पाइपची जोडणी झालेली आहे. म्हणजे पंधरा दिवसात एका पाइपची जोडणी करण्यात आली. जर समांतरच्या कामाची अशीच गती राहिली तर पाइपलाइन पूर्ण व्हायला तब्बल ५३७१ दिवस म्हणजेच १४ वर्षे महिने लागतील. यावरून ही कंपनी ही किती स्वप्नवत आहे, याचा अंदाज सर्वसामान्यांना सहज येऊ शकतो.

समांतरची यंत्रणा तोकडी
पाइपलाइनसाठी चर खोदण्यापूर्वी कम्युनिकेशन केबल शोधून ती बाजूला काढली जात आहे. खोदकामासाठी अवघे तीन पोकलेन आहेत, तर पाइप उचलून चरमध्ये टाकण्यासाठी एका क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. जोडणीसाठी एक वेल्डिंग मशीन, दोन वेल्डर आणि इतर वीस कामगार, असा समांतरचा कर्मचारी वर्ग आहे. एवढ्या तोकड्या यंत्रणेच्या भरवशावर समांतर जलवाहिनी वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन सिटी वॉटर युटिलिटी कंपनी देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऑगस्ट २०१७ अखेरपर्यंत समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करायचे असल्यास प्रतिदिन किमान नऊ पाइपांची जोडणी अपेक्षित आहे. मात्र, समांतरकडे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नाही. १२ फूट खोल आणि मीटर रुंद चर खोदून त्यात क्रेनद्वारे पाइप टाकावे लागतात. यासाठी मोठी यंत्रणा आवश्यक आहे.
DB स्टारचा थेट सवाल
अविक बिश्वास,
मॅनेजर,ब्रँडिंग अँड पीआर, सिटी वाॅटर युटिलिटीकंपनी

साडेतीन महिन्यांत केवळ सात पाइपची जोडणी झाली. हा प्रकार केवळ काम सुरू झाले हे दाखवण्याची औपचारिकता होती काय?
-नाही.सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे कामाची गती खूप कमी होती.
हीच गती राहिली तर पंधरा वर्षे लागतील...
नाही.आता आम्ही संपूर्ण यंत्रणा वाढवत आहोत. कामगारांची संख्याही वाढवली जाईल.
दिलेल्यामुदतीत म्हणजेच ऑगस्ट २०१७ पर्यंत काम पूर्ण होईल का?
-हो.त्या दृष्टीनेच आम्ही आता कामाला लागलो आहोत. एका दिवसात किमान ८० मीटर काम करण्याचे टार्गेट ठेवले आहे.