आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराराचा धाक दाखवत "समांतर'ची दादागिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादसिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने सोयीनुसार कराराचा अर्थ लावत मनमानी सुरू केल्याने त्याचा नागरिकांना फटका बसत आहे. करारात २४ तास पाणी
देण्याचे नमूद असताना मोफत टँकर बंद करून नागरिकांची गळचेपी सुरू केली आहे. कहर म्हणजे वसुलीच्या नावाखाली थकबाकी नसतानाही बिले दिली जात आहेत. हे
प्रकार थांबले नाहीत तर आठवड्यानंतर समांतरच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी दिला आहे.
समांतर जलवाहिनीचे काम प्रत्यक्ष सुरू व्हायचे आहे. औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीने शहराची पाणी योजना ताब्यात घेतल्यापासून नागरिकांच्या तक्रारी वाढत
आहेत. आज असेच तीन प्रकार महापालिकेत पाहायला मिळाले. प्रमोद राठोड राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ कोकाटे तक्रारी घेऊन कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे
यांना भेटले. पाठोपाठ तहानलेल्या पडेगावातील मीरानगरच्या नागरिकाचे शिष्टमंडळही धडकले. या वेळी कंपनीचे व्यवसाय अधिकारी गौरीशंकर बसू हेही उपस्थित होते.
नगरसेवकालाही फटका : नगरसेवकप्रमोद राठोड यांनी मागचे बिल भरूनही त्यांच्यावर थकबाकी दाखवत ७५९२ रुपयांचा भरणा करायला सांगणारी नोटीस कंपनीने दिली.
त्यामुळे तिरीमिरीत राठोड यांनी कोल्हे यांचे कार्यालय गाठले. बिले भरली असताना नागरिकांचा छळ करणे थांबवा, अशी मागणी त्यांनी केली. बसू यांना राठोड यांनी
चांगलेच सुनावले. वसुलीच्या कामाला गुंड लावले आहेत, ते फोन करून धमक्या देताहेत. थकबाकीच्या नावाखाली जबरदस्तीने वसुली सुरू आहे. आठ दिवसांत हे प्रकार
थांबले नाहीत, तर कंपनीच्या कार्यालयाला सील ठोकू कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी सर्वस्वी कंपनीची राहील, असा इशारा त्यांनी दिला.
पाणी नाही, टँकरही नाही
एन-७एन-८ भागात पाण्याचा दिवस असताना पाणी आले नाही. अशा वेळी कंपनीने टँकर दिले पाहिजे, असे सांगत कोकाटे यांनी कंपनीच्या कामावर हल्ला चढवला.
कंपनचे व्यवसाय अधिकारी गौरीशंकर बसू यांनी करारानुसारच काम करत आहोत, असे सांगताच कोकाटे राठोड भडकले. कराराचा सोयीचा अर्थ लावू नका. २४ तास पाणी
देणेही करारात आहे, असे ठणकावून २० तारखेच्या सर्वसाधारण सभेत समांतरची चिरफाड करू, असा इशारा दिला.
बसू म्हणतात, मनपाचे दर परवडत नाहीत
व्यवसायअधिकारी गौरीशंकर बसू म्हणाले की, मनपाने ३६०० रुपये दराने टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे. हा दर आम्हाला परवडत नाही. त्याला ५००० रुपये खर्च येतो.
त्यावर कोकाटे राठोड यांनी मनपाच्याच दराने पाणीपुरवठा करणे ही कंपनीची जबाबदारी असल्याचे ठणकावत मनमानी करू नका, असा इशारा दिला.
टँकर देण्यास नकार
पडेगावातीलमीरानगर भागात हजार लोकवस्ती आहे. या भागात नळ नाहीत. तेथे मनपा टँकरने पाणी पुरवायची. तेथील लाइनमनकडे नागरिक पैसे भरायचे टँकर यायचे; पण आता कंपनीकडे योजना आल्यावर त्यांनी हे टँकर बंद केले. कंपनीने नागरिकांकडे पावत्या मागितल्या. लाइनमनने पावत्या दिलेल्याच नाहीत हे सांगितल्यावर आम्ही पाणीदेऊ शकत नाही, असे सांगत कंपनीने हात वर केले. नागरिकांनीही कोल्हेंकडे गाऱ्हाणे मांडले. त्यांनी बसू यांना व्यवस्था करण्यास सांगितले.