आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"समांतर, भूमिगत'चे आज ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरासाठीची ७९२ कोटी रुपयांची समांतर जलवाहिनी, ४६४ कोटींची भूमिगत गटार या दोन योजनांच्या भूमिपूजनाला अखेर मुहूर्त लागला आहे. शनिवारी दोन्ही योजनांचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होईल.

१ सप्टेंबरपासून ठेकेदार कंपनी शहराची पाणीव्यवस्था ताब्यात घेईल. भूमिगत गटार योजनेत शहराची सगळी जल व मलनसि्सारण व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. सिद्धार्थ उद्यानात सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार राजकुमार धूत, आमदार पंकजा पालवे-मुंडे, खासदार चंद्रकांत खैरे, मनपा आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे व महापौर कला ओझा उपस्थित असतील.
जनहित याचिका
काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दाते पाटील यांनी समांतरबद्दल जनहित याचिका शुक्रवारी दाखल केली. न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठासमोर सादर याचिकेत १ सप्टेंबरला ही योजना ठेकेदाराकडे हस्तांतरित करू नये, अशी मागणी केली आहे. अॅड. अिनल गोळेगावकर काम पाहत आहेत.