आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samantar Water Pipeline Project Two File Pending Issue Aurangabad

दोन फायली तुंबल्याने ‘समांतर’चे घोडे पेंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराने दिलेल्या कागदपत्रांवर आठवडाभरात निर्णय घेण्याचे आयुक्तांनी जाहीर केले असले तरी दोन महत्त्वाच्या फायली अद्याप तुंबलेल्या असल्याने त्या मार्गी लागण्यास किमान तीन महिने लागू शकतात. तसे झाल्यास समांतरचे घोडे पुन्हा पेंगणार आहे.

समांतर जलवाहिनीचे काम अतिशय अतिशय मंद गतीने पुढे सरकत आहे. राजकीय पातळीवर शिवसेनेने हा महत्त्वाकांक्षेचा विषय केला आहे, तर तांत्रिक बाबींच्या आधारे प्रशासन फुंकून फुंकून पावले टाकत आहे. या तिढय़ात हे काम आणखी काही काळ लांबण्याची चिन्हे आहेत. कंत्राटदाराने लेखाबंद आणि कागदपत्रे मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला सादर केली. ही कागदपत्रे आठ दिवसांत पाहून निर्णय घेऊ, असे मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. शिवाय आणखी दोन फायलींचा निचरा होणे बाकी आहे.

वॉटर बाय लॉ अर्थात जल उपविधीची फाइल अद्याप मनपातच आहे. मनपा अधिनियम 66 (अ) नुसार या बाय लॉला सरकारची मंजुरी आवश्यक आहे. ही फाइल सरकारकडे गेल्यावर त्यावर सूचना व हरकती मागवल्या जातील. त्यानंतर ते राजपत्रात प्रसिद्ध होईल. ही प्रक्रिया साधारणपणे तीन महिन्यांची असते. त्यामुळे आजच्या घडीला ही फाइल पाठवली तरी समांतरचे काम सुरू व्हायला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आधी काम सुरू करून ही प्रक्रिया यथावकाश पूर्ण करून घेता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.

पीपीपीची फाइल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तुंबली आहे. सचिव र्शीकांत सिंग यांनी ही फाइल मंजूर करण्याची शिफारस करीत मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. त्यांच्या सहीनंतर ते काम फत्ते होईल. पाणीपुरवठा ही मनपाची जबाबदारी असल्याने तिचे हस्तांतर खासगी कंपनीकडे करावयाचे झाल्यास त्याला सरकारची मान्यता घेणे आवश्यक आहे.