आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरेंना समज द्या; भाजपच्या मनपा पदाधिकार्‍यांची मुंडेंना विनवणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - समांतर जलवाहिनीप्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीला जाताना खासदार चंद्रकांत खैरे यांनी डावलल्यामुळे मनपातील भाजपचे पदाधिकारी संतापले आहेत. त्यांनी खैरेंच्या विरोधात आघाडी उघडली आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे त्यांनी खैरेंबद्दल तक्रार केली असून तत्काळ त्यांना समज द्या, अशीही विनवणी केली आहे.

समांतरच्या आर्थिक बोजाविषयी महापौर कला ओझा यांच्या दालनात गेल्या आठवड्यात युतीच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात मुंडे व उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात 7 ऑक्टोबरला खैरे आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समांतरचे काम मार्गी लावण्याची विनंती केली. यावरून भाजपचे नेते संतापले आहेत. भाजपचे गटनेते संजय केणेकर म्हणाले, भाजपला डावलून खासदार खैरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमची सकारात्मक भूमिका असताना, असे डावलणे चुकीचे आहे. शिवसेनेचे सभागृहनेते सुशील खेडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची वेळ अचानक मिळाली. भाजपला आम्ही टाळलेले नाही.