आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samantar Water Supply News In Marathi, Divya Marathi, Aurangabad Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'समांतर'च्या हस्तांतरणानंतर शहरातील ४७ टँकर बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहराचापाणीपुरवठा सोमवारपासून (१ सप्टेंबर) समांतरचे कंत्राटदार औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी प्रायव्हेट या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर लगेचच नळ जोडणी नसलेल्या मनपा हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे कंत्राट कंपनीने सोमवारी रद्द केले. त्यामुळे शहरात विविध भागात पाणीपुरवठा करणारे ४७ टँकर बंद झाले. तुरळक िठकाणी पाणी मिळाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी मात्र आता कंत्राटदारांकडे बोट दाखवले आहे.

शहराची व्याप्ती वाढताना आणि तुल नेने त्याच गतीने नवे कनेक्शन देण्याची मनपाची क्षमता नव्हती. त्यामुळे मनपाने पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ पासून खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. १९९९ मध्ये सचिन वॉटर सप्लायर्सला काम दिले त्या वेळी फक्त दोन टँकरला काम देण्यात आले होते. त्यानंतर २००० ते २००५ मध्ये टँकर पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर २००६ साईकृपा ट्रान्सपोर्ट सचिन वॉटर सप्लायर्सला काम दिले त्या वेळी दोघांचे प्रत्येकी तीन टँकर सुरू होते. २००६ ते २३ फेब्रुवारी २०११ पर्यंत पुन्हा सचिन वॉटरला काम मिळाले त्या वेळी २० टँकरद्वारे तहान भागवण्यात येत होती. २४ फेब्रुवारी २०११ ते ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंत अमुल लॉरी सर्व्हिसेसने चार वर्षांत ४७ टँकरने पाणीपुरवठा केला. ४० हजार नागरिकांना कधीही पाणीटंचाईचा सामना करावा लागला नाही. आता मात्र समांतरच्या कंत्राटदारांनी जुने टँकर बंद केले आहेत. यासंदर्भात समांतरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी आताच काही सांगण्यास नकार दिला आहे. मात्र, टँकरचे काम दुसऱ्या कंत्राटदारांना देण्याचे ठरले आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ देणार नाही, असे त्यांचे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतीयले यांनी सांगितले.

नळ जोडणीअभावी या भागात टँकर सुरू जयभवानीनगर, मिसारवाडी, भारतनगर, हनुमाननगर, सिंधीबन, पडेगाव, मिटमिटा, गारखेडा, सातारा रोडलगत मनपाचा परिसर, रेणुकामातानगर, भारतनगर, आनंदनगर, चिकलठाणा, हर्सूल, जटवाडा, माजी सैनिक कॉलनी, जगदीशनगर, पेठेनगर आदी भागांतील नागरिकांसह नळ जोडणी नसलेल्या मनपा हद्दीतील वसाहतींना खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आता समांतर योजनेत सर्व भागांना नळ जोडणी देण्याचे प्रस्तावित असून यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पाणी तोपर्यंत टँकरनेच देणे बंधनकारक आहे.

3 वर्षांपर्यंत टँकर देणे बंधनकारक
१५ वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा
४७ टँकर सोमवारी झाले बंद
४० हजार लोकसंख्येसाठी टँकर
३००० रुपये वर्षाला शुल्क
समांतरचे टँकर सुरू

नव्या एजन्सीकडे काम
^मनपाकडेसुरू असलेले आमचे कंत्राट बंद झाले. टँकरने पाणीपुरवठा सुरूच राहणार आहे. सात वेळा आमच्या त्यांच्याशी बैठका झाल्या, पण त्यांनी दिलेल्या दरात आम्ही काम करण्यास तयार नाही. त्यामुळे सोमवारपासून काम बंद करण्यास सांगितले असून आम्हीही टँकर बंद ठेवले आहेत. लोकांची गैरसोय होत असेल तर त्याला आता आम्ही थोडेही जबाबदार राहणार नाहीत. सचिनसुरडकर, संचालक,अमूल लॉरी सर्व्हिसेस

काम कुणाला द्यायचे हा आता त्यांचा प्रश्न
^समांतर योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचे संपूर्ण काम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी प्रायव्हेट लमििटेड कंपनीला देण्यात आले आहे. सोमवारपासून त्यांनी काम हाती घेतले. त्यामुळे खासगी टँकरने पाणीपुरवठा कसा करायचा, त्याचे काम कुणाला द्यायचे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये मनपाला हस्तक्षेप करता येणार नाही. शहराभोवती वाढलेल्या लोकसंख्येला पाणी देणे कंत्राटदाराची जबाबदारी आहे. सखारामपानझडे, शहरअभियंता