आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samantar Waterpipe Scheme Not Completeing Given Period

समांतर जलवाहिनी योजना लांबणीवर,योजनेचे भवितव्य किमान 6 महिने लटकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सात वर्षांपासून चर्चेच्या गु-हाळात अडकलेली समांतर जलवाहिनीची योजना लांबणीवर पडणार आहे. उपविधीच्या (बायलॉज) नियमावलीस शासनाची मंजुरी घेण्यापूर्वीच ठेकेदारांशी करार केल्यामुळे योजनेचे भवितव्य किमान 6 महिने लटकले आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांनी मनपाला पाठविलेल्या पत्रातून हे स्पष्ट झाले.
शहराला 2025 मध्ये रोज किमान 325 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. त्या दृष्टीने 2005 मध्ये योजना आखण्यात आली. प्रारंभी ती खासगीकरणातून करण्याचा निर्णय झाला. खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यास विरोध करून केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणण्याची तयारी दाखवली. केंद्राकडून 144 कोटींचा निधी आला. तो मनपाच्या तिजोरीत जमा झाल्यावर निविदा काढून दिल्लीच्या एसपीएमएल कंपनीला ठेकाही देण्यात आला.
सिंग यांच्या पत्राने फुटले बिंग!
सूत्रांनुसार, सिंग यांनी पत्रात म्हटले आहे की, ठेकेदाराशी करारानंतर उपविधीची नियमावली शासनाकडे पाठवण्यात आली. त्यामुळे अशा प्रकारची नियमावली अन्य राज्यात आहे काय, याची माहिती घेऊन कार्यवाही करावी लागेल. त्यास काही काळ लागणार आहे.