आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samarpan Book Publishing By Dr. Narendra Jadhav Hand

वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारी "समर्पण' : डॉ. नरेंद्र जाधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "प्रेमात हुरळून गेलेल्या मानसीला वाटेत नियतीने कितीतरी काटे पेरून ठेवल्याचे भान उरत नाही. अचानक प्रियकराचा अपघात होतो. या काळात तिने त्याची घेतलेली काळजी, त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी केलेली तपस्या या सगळ्यात झाकोळून गेलेली तिची स्वप्ने...' हा "समर्पण' कादंबरीतील प्रसंग वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे,' असे प्रतिपादन साहित्यिक तथा नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

कल्याणी वाघ लिखित "समर्पण' कादंबरीच्या प्रकाशनप्रसंगी तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार होते. डॉ. जाधव म्हणाले, शहरात मुलांच्या करिअरबाबत पालक जास्त आग्रही झाले आहेत, पालकांनी अपुऱ्या महत्त्वाकांक्षा मुलांवर लादू नयेत, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.

अवघ्या पंचविसाव्या वर्षी लेखिकेची ही दुसरी कादंबरी असून "संघर्ष' या पहिल्या कादंबरीला मिळालेल्या प्रतिसादातून "समर्पण' ही मानसी नामक मुलीची प्रेमकथा कादंबरीच्या रूपाने प्रकाशित झाली आहे. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी "स्वरसाक्षी' प्रस्तुत "चांदणं उन्हातलं' हा डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या गीतांचा कार्यक्रम अतुल दिवे यांनी सादर केला.
फोटो - तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी "समर्पण' कादंबरीचे प्रकाशन करताना डावीकडून लेखिका कल्याणी वाघ, डॉ. नरेंद्र जाधव, मानसिंग पवार आणि विलास फुटाणे.