आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादच्या संभाजीचा गाेल्डन डबल धमाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - येथील युवा खेळाडू संभाजी शिवाजी झनझन पाटीलने रविवारी अायएसएसएफच्या ज्युनियर वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाचा डबल धमाका उडवला. त्याने वैयक्तिक अाणि सांघिक गटात सुवर्णवेध घेतला. त्याने युवा गटाच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारामध्ये हे साेनेरी यश संपादन केले. याशिवाय त्याने या खेळ प्रकाराच्या सांघिक गटात गुरमितसिंग अाणि ऋतुराज सिंगसाेबत सुवर्णपदक पटकावले. तत्पूर्वी भारताचा युवा नेमबाज शुभंकर प्रामाणिकने सुवर्णपदक पटकावले. अशा प्रकारे भारताला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन सुवर्णपदकांची कमाई करता अाली. नेमबाजीची ही विश्वचषक स्पर्धा अझरबैजान येथे सुरू अाहे. या स्पर्धेत जगभरातील २७ देशांच्या तब्बल २७९ युवा नेमबाजांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा एकूण १८ खेळ प्रकारात रंगत अाहे.
५६२ गुणांची कमाई
अाैरंगाबादच्या संभाजीने वैयक्तिक गटात ५६२ गुणांची कमाई करून सुवर्णपदक पटकावले. यात त्याने अाॅस्ट्रेलियाच्या सर्जेई अाणि जेम्सला पिछाडीवर टाकले. संभाजीच्या अव्वल कामगिरीमुळे भारताच्या खात्यावर अाता दाेन सुवर्णपदकांची नाेंद झाली.
बातम्या आणखी आहेत...