आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sambhajiraje Bhosale News In Aurangabad, Divya Marathi, Maratha Community, Congress

काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठिंबा नाही,छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार नाही, असा इशारा स्पष्ट शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच आरक्षण जाहीर करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिले होते. लोकसभेपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात प्रचार करणार असल्याचे आपण जाहीर केले होते. मात्र, दोन एप्रिलला मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर दोन महिन्यांच्या आत ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला नोकरी व शैक्षणिक आरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
चव्हाणांचे निमंत्रण फेटाळले
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पाठवलेले प्रचाराचे निमंत्रण मी फेटाळले. कारण सत्ताधार्‍यांनी हा प्रश्न मार्गी लावला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. सरकारची सकारात्मक भूमिका बघता त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा, असे ते म्हणाले.
मेटेंच्या संदर्भात ते म्हणाले, मेटेंचा विषय वेगळा आहे. मात्र शिवसंग्रामचे 9 पदाधिकारी आमच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे आरक्षणासाठी तेही आमच्या सोबत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, सरचिटणीस मनोज अखेर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेश संघटक अप्पासाहेब कुडेकर, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाट, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदीप सोळुंके, जिजाऊ ब्रिगेडच्या अनुराधा ठोंबरे, रेखा औताडे, विजय काकडे, मनोज कावरे उपस्थित होते.
आरक्षणासाठी निवडणूक लढलो नाही
40 ते 45 संघटनांना सोबत घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आपण तीन वर्षांपासून काम करत आहोत. आरक्षण मागणार्‍या सर्व संघटनांना एकत्रित कसे ठेवले हे माझे मलाच माहिती आहे. आरक्षण मिळेपर्यंत आपण कोणालाही पाठिंबा देणे उचित होणार नाही. आरक्षण मिळाले की माझा उद्देश पूर्ण होईल. मी बोलतो ते तडीस नेतो. आरक्षणाच्या मुद्दय़ावर ज्या संघटना माझ्यासोबत आहेत त्या त्यांचे बघत बसतील.