आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्धत बदलल्याशिवाय समृद्ध शेती करता येणे अशक्य,संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर - परंपरागत शेतीची पद्धत बदलल्याशिवाय समृद्ध शेती करता येणार नाही. कृषी प्रदर्शनातून शेतकर्‍यांचे अनुभवविश्व समृद्ध होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांना परिचय होतो त्यामुळे शेतीसाठी कृषी प्रदर्शने भरणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी गंगापूर येथे बोलताना केले.


गंगापूर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शन व शिवनाम सप्ताहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या वेळी लासूर स्टेशन बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील डोणगावकर, संभाजी ब्रिगेडचे शांताराम कुंजीर, राहुल बनसोड, योगेश शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन विशाल गायकवाड व नितीन जाधव यांनी केले, तर आभारप्रदर्शन योगेश शेळके यांनी केले.


आरक्षणाची भूमिका पुण्यात
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मराठा समाजाने या निवडणुकीत काय भूमिका घ्यावयाची यासंबंधीचा निर्णय पुणे येथे येत्या 22 तारखेला होणार्‍या राज्यातील सर्व मराठा समाजाच्या संघटनांच्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.