आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी अन् सत्ताधारी चार नेते; तरीही सूर जुळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शेंद्रा एमआयडीसीजवळ झालेल्या कार्यक्रमात तीन मुद्द्यांवर भर दिला. त्यातल्या एकेका मुद्द्यावर केंद्रीय मंत्री उमा भारती, भाजपच्या नेत्या किरण बेदी आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांच्या भाषणात भर दिला. जसे...

मेधा पाटकर यांनीमांडलेले तीन मुद्दे...
1.सरकार : शेतकऱ्यांच्या विरोधातच
सरकार, मग ते आताचे असो नाही तर आधीचे. सगळे सारखेच. कायम शोषित, पीडित आणि शेतकऱ्यांच्या विरोधातच. भांडवलदारांचे हित आधीच्या सरकारनेही जपले. आताची सत्ताधारी मंडळीही तेच करत आहेत.
2. महिला : अपूर्व शक्ती
जमिनीच्या या लढाईत विकले जाऊ नका. मातीमोल किमतीला काळी आई कुणाच्या घशात घालू नका, अशी ठाम भूमिका नाथनगर, वडख्यातील महिलांनी घेतली. हा विजय त्यांच्यातील अपूर्व शक्तीचाच आहे. पुरुषांनो, महिला शक्तीचा सन्मान करा.

3. प्रशासन : भांडवलदारांसोबत
नाथनगरच्या शेतकऱ्यांची जमीन भांडवलदारांच्या घशात जावी यासाठी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनीच खोटी कागदपत्रे तयार केली. कोऱ्या पंचनाम्यांवर सह्या घेतल्या. प्रशासनाच्या या काळ्या कृत्यांमुळेच इथला शेतकरी देशोधडीला लागला होता.

अॅड. प्रकाश अांबेडकर म्हणाले....
सरकार मूठभरांच्या हिताचे
देश आणि राज्यातील सरकार मूठभरांच्याच हिताचे आहे. मोजक्या लोकांसाठीच सरकारची पावले पडत आहेत. विशिष्ट विचार त्यांना पुढे आणायचा आहे. आरक्षण संपुष्टात आणायचे आहे. काँग्रेस सरकार संपले तसे या राज्यकर्त्यांनाही घालवावे लागेल.
-पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ..

किरण बेदी म्हणाल्या...
मुलांनाही किरण बेदी होण्यास सांगा
शिक्षणामुळे सामंजस्य, समजूतदारपणा, तर खेळामुळे साहस अंगी येते. माझ्या बाबतीत हे झाले. आपल्या मुलींनीही किरण बेदी व्हावे, असे पालकांना वाटते. मुली तर होतीलच. त्यांच्यात ती शक्ती आहे; पण मुलांनी का किरण बेदीसारखे होऊ नये? त्यांनाही ते सांगा.
-स.भु.च्या विद्यार्थी संमेलनात...

उमा भारती म्हणाल्या....
नोकरशाही अंधार करते
तुम्ही कितीही उत्साहाने काम करायचा प्रयत्न करा; परंतु प्रशासनातील अधिकारी, नोकरशाही अंधार निर्माण करते. डोक्यावर बर्फ ठेवलेले अधिकारी क्रूरपणे तुमच्या कामातला आनंद हिसकावून घेत राहतात.
-वाल्मी येथील कार्यक्रमात...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...
बातम्या आणखी आहेत...