आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पैठण - पैठणनजीक शहागड रस्त्यावरील आयटीआयजवळ कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळूसाठा जमवणारा वाळूमाफिया व गायत्री एंटरप्रायजेसचा मालक आशिष शर्माला औरंगाबाद पोलिसांनी सोमवारी मंत्रालयातून अटक केली. पोलिस अधीक्षक इशू सिंधू व महसूल विभागाच्या पथकाने शहागड रस्त्यावरील गट क्रमांक 208 मधून 80 हजार 968 ब्रास व 196 गटामधून 30 हजार 208 ब्रास वाळूसाठा जप्त केला होता. सहा एकरवर पसरलेल्या या वाळूसह 3 ट्रक, 3 पोकलेन जप्त करण्यात आले होते. 27 कामगारांना ताब्यात घेण्यात आले होते. मुख्य आरोपी आशिष शर्मा मात्र फरार होता. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शर्मा याला 30 डिसेंबर 2011 रोजी टाकळी अंबड येथील वाळू पट्टा 1 कोटी 1 लाखाच्या बोलीवर मिळाला होता. पाटेगावचा वाळूपट्टाही त्याने 2 कोटी 58 लाखाच्या बोलीवर घेतला होता. त्यापोटी शर्माने शासनाला साडेतीन कोटी रुपये जमा केले होते. केवळ 1 हेक्टर जागेवर साठवणुकीची परवानगी असताना शर्माने सहा एकरावर वाळू साठवली होती. दरम्यान, शर्माला औरंगाबादेत आणल्यानंतर पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी त्याची दोन तास कसून चौकशी केली.
साडेसात कोटींचा दंड - अवैध वाळूसाठा जमवल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने शर्मा याला साडेसात कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड कमी करण्यासाठी शर्मा आज मंत्रालयात गेला होता. याची गुन्हे शाखेला खबर मिळल्यानंतर त्याला मंत्रालयातच अटक करण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.