आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांवर दबाव, वाळूचे ट्रक जप्त; धमकी देणाऱ्या दोन चालकांवर गुन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गाडी कोणाची आहे माहिती आहे का ? आमच्यावर कारवाई करतात का? अशी धमकी देणाऱ्या दोन चालकांवर गुन्हे दाखल करत त्यांचे ट्रक जप्त करण्यात आले आहेत. सोमवारी मध्यरात्रीनंतर विनापरवानगी शहरात प्रवेश करतांना हे ट्रक आढळले होते. या घटनेची जवाहरनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संग्रामनगर उड्डाणपुलावरून सुतगिरणी चौकातील छोट्या गल्ल्यांत प्रवेश करणारे दोन हायवा ट्रक पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास थांबवले. चालकांनी त्यांनाच दमदाटी केल्यामुळे पोलिसांनी या दोन्ही गाड्या जप्त करून चाकातील हवा सोडून दिली. या ट्रकद्वारे पैठणहून वाळू आणली जात असल्याचे तपासात समोर आले असून ट्रकमालक दावरवाडी आणि नायगाव येथील आहेत. पोलिसांना धमकवण्यापर्यंत चालकांची मजल जावी, असा हा ट्रक नेमका कोणाचा याबाबत अनेक चर्चा मंगळवारी सुरू होत्या.
बातम्या आणखी आहेत...