आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको-हडकोत पादत्राणे चोरांची दहशत,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद | सिडको-हडकोपरिसरात बूट-चप्पल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये वेगळीच दहशत पसरली आहे. गेल्या दोनच दिवसांत ५० घरांतून पादत्राणे चोरीस गेली आहेत. या चोरीची तक्रार अजून तरी पोलिस ठाण्यात झालेली नाही. मात्र ही बातमी कानोकानी सर्वत्र पसरल्यापासून लोकांनी पादत्राणे दरवाजासमोर तसेच गॅलरीत ठेवणे बंद केले आहे. आलेल्या पाहुण्यांनाही घरात पादत्राणे काढण्यास सांगितले जात आहे.

अधिकृत तक्रार झाली नसली तरी पादत्राणे चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. फ्लॅटची गॅलरी तसेच दरवाजासमोर रात्री काढून ठेवलेली पादत्राणे सकाळी गायब होत असल्याने अनेकांनी आता पादत्राणांची जागा बदलली आहे.हडको, एन- येथील एक नोकरदार सकाळी ५.३० वा. कामावर निघतात. दोन दिवसांपूर्वी ते घाईत तयार होऊन निघाले. तेव्हा दरवाजा समोरून सर्व पादत्राणे गायब होती. कोणाचीही पादत्राणे चोरट्यांनी सोडली नाहीत.

साधी चप्पल घ्यायची असल्यास ती अडीचशे रुपयांपासून पुढे मिळते. घरातील चार जणांची पादत्राणे गायब झाल्यानंतर किमान एक हजार रुपये खर्च होतो. सामान्य कामगारांचे यामुळे मासिक अर्थकारण बिघडले आहे.
पुढे वाचा.. पैशासाठी सुनेचा छळ ;गुन्हा दाखल
बातम्या आणखी आहेत...