आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदल मिरवणुकीने आज उरुसास होणार प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद : येथील हजरत जरजरीजरबक्ष यांच्या उरुसाची प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली असून बुधवारी संदल मिरवणुकीने उरसास प्रारंभ होणार आहे. यासाठी उरूस व्यवस्था समितीच्या वतीने जागेचा आढावा घेऊन पाहणी करण्यात आली. परिसरात यंदाही विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. १३ डिसेंबर रोजी बारावफात असल्याचे दर्गा कमिटीचे सदस्य अॅड. कैसरोद्दीन तसेच शरफोद्दीन रमजानी यांनी सांगितले.

खुलताबाद जरजरीजरबक्ष यांच्या ७३० व्या मुख्य उरुसाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. ७ डिसेंबर रोजी संदल मिरवणुकीने उरुसास सुरवात होणार आहे. ८ डिसेंबरला उरुसाचा मुख्य दिवस आहे. त्याचप्रमाणे १३ डिसेंबर रोजी बारावफात आहे. या दिवशी मोहंमद पैगंबर यांच्या पोशाखाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक खुलताबाद येथे येतात.
खुलताबादचा उरूस हा औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठा उरूस भरतो. या उरुसात देशभरातून भाविक येत असतात. येथील उरूस हा किमान महिनाभर चालतो. प्रत्येक वर्षी या उरुसात लाखो भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून मैदानावरील रस्ते रुंद करण्यात आले आहेत.
नुकताच परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, परीविक्षाधीन तहसीलदार रोशन मकवाना, मुख्याधिकारी निलू पाटील, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सदस्य अॅड. कैसरोद्दीन, नईम बक्ष आदींनी मैदानातील जागेचा अाढावा घेतला.

उरुसानिमित्त बैठक : जिल्हाधिकारी निधी पांडे व पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी उरुसातील सोयी-सुविधांकरिता औरंगाबाद येथे बैठक घेतली आहे. येणाऱ्या भाविकांना पाणीपुरवठा व्यवस्थितरीत्या पुरवणे, लोडशेडिंग बंद करणे, अग्निशमन दलाची व्यवस्था करणे यासह उरुसादरम्यान औरंगाबाद मार्गाकडून येणारी जड वाहने दौलताबाद टी पाॅइंट येथून, तर कन्नड मार्गाकडून येणारी जड वाहने वेरूळ येथून वळवणे.
बातम्या आणखी आहेत...