आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'संदूक'चे रहस्य पाच जूनला उलगडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वामनराव अष्टपुत्रे या १९४० च्या दशकातील स्वप्नाळू पोस्टमनची कथा उलगडणारा "संदूक' चित्रपट जून रोजी प्रदर्शित होत आहे. अतुल काळे दिग्दर्शित या चित्रपटातून सुमीत राघवन पहिल्यांदाच मराठीत पाऊल ठेवत आहे. भार्गवी चिरमुले हिची चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. एक संदूक उघडते अन् सामान्य पोस्टमनचे आयुष्य बदलून जाते, असे कथानक असलेला हा चित्रपट आहे. प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम शहरात आली असताना त्यांनी "दिव्य मराठी' कार्यालयाला भेट देत दिलखुलास चर्चा केली.
काळे यांचा हा चित्रपट ड्रीम प्रोजेक्ट आहे. याबद्दल ते म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून मी या चित्रपटासाठी तयारी करत होतो. माझ्या आईने सांगितलेल्या एका छोट्याशा किश्शाला फुलवत हे कथानक तयार केले आहे. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे सुमीत राघवन या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. भार्गवी ही गुणी अभिनेत्री यामध्ये आहे. चित्रपटाची अतिशय सशक्त अशी पटकथा आशिष रायकर यांनी लिहिली आहे. तर साहित्य, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध बाबींवर पकड असलेल्या हृषीकेश जोशी याने चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. ४० च्या दशकात घेऊन जाणारा आणि विनोदाच्या तुषारांत प्रेक्षकांना चिंब करणारा चित्रपट आहे.
सुमीत म्हणाला, मराठीत पदार्पणासाठी जवळपास २२ ते २५ वर्षांचा काळ मी जाऊ दिला. याचे कारण दमदार संहिता आणि उत्तम दिग्दर्शक तसेच प्रमुख भूमिका असल्याखेरीज मला चित्रपट करायचा नव्हता. १९८६ पासून मी नाटक, टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. मात्र २००७ मध्ये सारेगमापातून जेव्हा प्रेक्षकांसमोर आलो तेव्हा त्यांच्या प्रचंड प्रेमाने मला मराठीकडे खेचले. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बहराचा काळ असतानाही मला अनेक ऑफर आल्या. मात्र, मला लीड भूमिका हवी होती, ती वाट्याला येईपर्यंत मी काम करणार नाही,असे निश्चित केले होते. अतुल आणि मी गेल्या ३० वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. बालनाट्यापासून सोबत काम करत आहोत. आता संधी मिळाल्याचे सुमीतने सांगितले.
भार्गवी म्हणाली, या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिणारे सगळेच भक्कम आहेत. दिग्दर्शक अतुल आणि सहकलाकार सुमीत यांच्यावर माझा विश्वास आहे. चित्रपटाची सिनेवर्तुळात खूप चर्चा आहे. संदूक आणि मी अशा दोनच महिला चित्रपटात आहेत, त्यामुळे माझी भूमिकाही छान आहे.