आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाने याचिका फेटाळली; संग्रामनगरचे रेल्वे गेट बंद, 50 हजार नागरिकांना बसेल फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संग्रामनगर येथील रेल्वे गेट सुरू ठेवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यानंतर मंगळवारी (८ ऑगस्ट) रोजी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गेटच्या दुतर्फा २६ सिमेंट ब्लॉक आणि खांब लावण्यात आले आहेत. या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 
 
दोन दिवसांनंतर गेट उघडले जाईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला. दरम्यान, गेट बंद झाल्याने मंगळवारी सायंकाळी संग्रामनगर परिसरातील काही नागरिकांनी घोषणाबाजी केली. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी कोर्टाचे आदेश दाखवताच माघार घेतली. गेट बंद झाल्याने बीड बायपास ते शहानूरवाडी आणि शहानूरवाडीतून बीड बायपासकडे जाणाऱ्या ५० हजार नागरिकांना फटका बसणार असून शिवाय संग्रामनगर उड्डाणपुलावर वाहतूक कोंडीही झाली. मंगळवारी सायंकाळी प्रा. प्रशांत अवसरमल, मनोज जैस्वाल, जयदीप शिंदे, प्रदीप तोमर, प्रसाद बरमे, ज्योती पाटील आदींनी निदर्शने केली. 

संग्रामनगरात रेल्वे आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने उड्डाणपूल बांधला. त्याच वेळी संग्रामनगर रेल्वे गेट येथे भुयारी मार्गाची मागणी होती. मात्र, मनपाकडे निधी नसल्याने काम झाले नाही. वर्षभरापूर्वी नागरिकांनी आंदोलन केल्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून दहा कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात निधी मिळालाच नाही. 
 
अखेर मार्ग झाला बंद 
भुयारीमार्ग झाल्यानंतरच गेट बंद करावे, अशी विनंती करणारी जनहित याचिका श्रीमंतराव गोर्डे पाटील यांनी अॅड. एम. एन देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. तेव्हा गेट बंद करण्यास खंडपीठाने १५ डिसेंबर २०१६ पर्यंत अंतरिम स्थगिती दिली होती. खैरेंच्या विनंतीवरून सोमवारपर्यंत गेट खुले होते. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाच्या शपथपत्रात म्हटले होते की, गेट सुरू ठेवले तर सुमारे १० लाखांचा भुर्दंड सहन करावा लागतो. 
 
दरम्यान, दुरुस्तीसाठी दोन दिवसांकरिताच गेट बंद केल्याचा दावा दक्षिण मध्य रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक डाॅ. ए. के. सिन्हा यांनी सांगितले. मात्र, कोर्टाच्या निर्णयानुसार हे गेट कायम बंद करावे लागणारच आहे, असेही ते म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...