आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातल्या प्राचीन नाट्यगृहात 'संशयकल्लोळ’, लंडनमधील पिकॉक नाट्यगृहात प्रथमच भारतीय नाटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुमारे १०० वर्षे जगभरातील नाटकांनी उजळून निघालेल्या लंडनमधील पिकॉक नाट्यगृहात प्रथमच भारतीय नाटक अवतरणार आहे. हा बहुमान मिळाला आहे मराठीतील अजरामर कलाकृतींपैकी एक अन नुकताच सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाला.

येत्या ९ ऑक्टोबर रोजी पिकॉकच्या रंगभूमीवर संशयकल्लोळचा प्रयोग होईल, अशी माहिती नाटकाचे निर्माते आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी “दैनिक दिव्य मराठी’ला दिली आहे. सुमारे ३५ नाट्यगृह एकत्रितपणे डौलात मिरवणारे लंडनमधील “ट्रॅफल्गार चौक’ जगभरातील नाट्यप्रेमींसाठीची पंढरी म्हटली जाते. या ठिकाणी जगभरातील विविध भाषांमधील नाटकांचे रोज प्रयोग होत असतात.

याचठिकाणी जगप्रसिद्ध “पिकॉक’ हे नाट्यगृह असून आगामी १३ नोव्हेंबर रोजी ते वयाची १०५ वर्षे पूर्ण करणार आहे. गोविंद बल्लाळ देवल यांची मूळ निर्मिती असलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकानेही यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे या दोन्ही रचनांचा एक वेगळाच मिलाप या निमित्ताने जुळून आला आहे. सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच प्रसिद्ध नाट्यकलाकार प्रशांत दामले यांनी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. राज्यात प्रचंड मागणी असणारे हे नाटक “पिकॉक’च्या निमित्ताने प्रथमच सातासमुद्रापार पोहोचले अाणि आगळ्या वेगळ्या नावलौकिकासह त्याने नवी उंची गाठली आहे.

भारतीय भाषेतील प्रयोगास संधी
भारतातील खाऊ गल्लीप्रमाणेच इंग्लंडमध्ये ‘ट्रॅफल्गार स्क्वेअर’ ही नाट्यगल्ली आहे. या ठिकाणी जगभरातील असंख्य नाटकांचे रोज प्रयोग होत राहतात. मात्र, आतापर्यंत एकदाही भारतीय भाषेतील कोणतेच नाटक इथपर्यंत पोहोचले नाही. संशयकल्लोळच्या निमित्ताने ही संधी मिळाली आहे. - प्रशांत दामले, निर्माता, संगीत संशयकल्लोळ
बातम्या आणखी आहेत...