आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामनगर उड्डाणपुलाचे शिवसेनेकडून उद्‍घाटन, शरद पवार यांच्या हस्ते होणार होते लोकार्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संग्रामनगर उड्डाणपुलावरुन श्रेयाचे राजकारण केले जात आहे. जनतेला होणारा त्रास थांबवण्यासाठी उड्डाणपुल खुला केला जात असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. 26 जानेवारी रोजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार होते. मात्र, रविवारी उद्‍घाटन न झाल्यामुळे शिवसेनेने पुढाकार घेऊन आज (सोमवार) सकाळी खासदार खैरे यांच्या हस्ते उद्‍घाटन करुन उड्डाणपुल जनतेसाठी खुला केला आहे.
या उड्डाणपुलाच्या नावावरुनही वाद झाला होता. रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुलाचे 'शाहनुर हमवी' असे नामकरण केले होते. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करुन ती पाटी काढून टाकली आणि काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर शिवसेनेचे पश्चिम शहरप्रमुख राजू वैद्य यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुलाला देण्याची मागणी करणारे पत्र महापौरांना देणार असल्याचे म्हटले होते.
शिवसेनेचे उपनेते आणि औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आज (सोमवार) सकाळी उड्डाणपुलाचे उद्‍घाटन उरकण्यात आले आहे. यावेळी आमदार संजय शिरसाट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील स्लाइडमध्ये, पुलाचे बेकायदा नामकरण

डिझाइन चुकले