आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संग्रामनगर उड्डाणपुलाची अधिकार्‍यांकडून पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - संग्रामनगर उड्डाणपुलाच्या स्लॅबला पडलेल्या भेगांची पाहणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मंगळवारी करण्यात आली.

यासंबंधीचे वृत्त ‘दिव्य मराठी’मध्ये प्रकाशित झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 28 जानेवारीला उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले होते. अवघ्या 20 दिवसांतच पुलाला भेगा पडल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एन. जी. बाफना यांनी पाहणी केल्यानंतर पुलाच्या स्लॅबला एक्स्टेन्शन जॉइंट्स दिल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे सिमेंटचे पाणी वाहून पापुद्रा तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. क्रांती चौक पुलासंबंधीही रस्ते विकास महामंडळातर्फे असेच सांगण्यात आले होते; परंतु नंतर तयार केलेला भाग पाडावा लागला होता.

जॉइंट्सच्या बाजूला तिरपी भेग पडल्याचे छायाचित्रात स्पष्ट दिसत असून याला अधिकारी सिमेंटचे पाणी वाहून गेल्याने पापुद्रा तयार झाल्याचे सांगत आहेत. पूल वाहतुकीस मोकळा केल्यानंतर मोटारसायकल चालकाचा अपघात झाला होता. त्यानंतर दर्गा येथील दरवाजाच्या दिशेने फायबरच्या दांड्या लावण्यात आल्या होत्या.