आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामनगर उड्डाणपुलाला बाळासाहेबांचेच नाव द्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-शहानूरमियाँ दग्र्याजवळील अर्थात संग्रामनगरच्या उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव 19 नोव्हेंबर 2012 रोजीच घेण्यात आला होता. सर्वसाधारणसभेने घेतलेल्या या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

गुरुवारी संग्रामनगरच्या उड्डाणपुलाला शहानूरमियाँ हमवी यांचे नाव देण्याच्या प्रयत्न झाला होता. रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे बेकायदा नामकरण केल्यानंतर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. या प्रकारानंतर आज शिवसेनेने महापौरांना निवेदन देत या पुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्याची मागणी केली. महापौर कला ओझा यांना दिलेल्या निवेदनात सभागृह नेते सुशील खेडकर व शिवसेनेचे शहरप्रमुख राजू वैद्य यांनी म्हटले आहे की, 19 नोव्हेंबर 2012 रोजी सर्वसाधारण सभेने एक ठराव करून संग्रामनगर पुलाला ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला.

सभागृहाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत असून त्यातून जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. काही जात्यंध, गुंड प्रवृत्तीची मंडळी याबाबत राजकारण करू पाहत आहेत, असा आरोप करत या प्रकरणात महापौरांनी जातीने लक्ष घालून ठरावाची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.