आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांच्या माध्यमातून देणार महिलांना सॅनिटरी नॅपकीन: पंकजा मुंडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशात केवळ पंधरा टक्के महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. त्यामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी शासनाच्या वतीने अस्मिता नावाची योजना राबवण्यात येईल. येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावास मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे. नॅपकीन पुरवण्याचे काम महिला बचत गटांना देऊ, अशी माहिती महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिली. 
 
ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरीसंबंधीच्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक आजार जडतात.  त्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी माध्यमिक शाळांतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.  सॅनिटरी नॅपकीन सीएसआर आणि बचत गटांतून  योग्यरीत्या ई-टेंडरिंग करून बचत गटातल्या महिलांना ४० ते ५० टक्के कमी दरात उपलब्ध होतील.
 
आजही ग्रामीण भागातल्या महिलांत मूत्राशयाचे आणि गर्भाशयाचे आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अनेक महिलांत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बीपीएलच्या माध्यमातून कमी दरात व्हॅक्सिन उपलब्ध करून देता येईल का, याचा विचार सुरू आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 
 
बातम्या आणखी आहेत...