आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष ग्रामसभेत स्वच्छतागृह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुकांची दमछाक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - स्वच्छतागृहांनी आज इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक केली. काहींकडे स्वच्छतागृह नव्हते तर काहींनी खोटी माहिती दिल्याचेही उघड झाले. स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यात पती-पत्नीची घाई दिसून आली.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे वैयक्तिक वापरासाठी स्वच्छतागृह असल्याचे प्रमाणपत्र व ग्रामसभेचा ठराव निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल करण्याच्या बंधनकारक अटीमुळे भावी उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली.तालुक्यातील 134 ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. 134 ग्रामपंचायत कार्यालये असले तरी ग्रामसेवकांची संख्या 90 आहे. तथापि दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार एकाच ग्रामसेवकांकडे असल्याने त्या ग्रामसेवकांना आज ग्रामसभा पार पाडण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यासोबत इच्छुकांचीही धावपळ उडाल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहवयास मिळाले.
पती-पत्नीची धावपळ - जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवण्यापूर्वी स्वच्छतागृह बांधल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र गुरुवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत पाहावयास मिळाले. या वेळी इच्छुक उमेदवारांनी स्वच्छतागृह बांधल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपड केली. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. काहींनी तर पती-पत्नीच्या नावे प्रमाणपत्राची मागणी केली. गंगापूर तालुक्यात आज गाजगाव, अंबेलोहळ, सिद्धनाथ वाडगाव, शिल्लेगाव, आसेगाव, घोडेगाव, फुलशेवरा, वजनापूर आदी ग्रामपंचायतींची ग्रामसभा झाली.
प्रत्यक्ष पाहणी - ग्रामसभेत इच्छुक उमेदवारांकडे शौचालय आहे किंवा नाही हे नागरिकांना विचारण्यात आले. काही नागरिकांनी इच्छुकांच्या घरी जाऊन शौचालय आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची सूचना केली. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी एन. डी. पाडळे यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या घरी जाऊन शौचालयांची पाहणी करण्यात आली. यात पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक शेख अपसराबी शेख दौलत यांच्याकडे शौचालय नसल्याचे दिसून आहे. गटासाठी 13 इच्छुक उमेदवारांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले, तर पंचायत समिती गणासाठी 16 इच्छुक महिलांनी वैयक्तिक शौचालय प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहे.