आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय भाटिया सिडकोचे नवे व्यवस्थापक संचालक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्याचे विक्रीकर आयुक्त संजय भाटिया यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. मंगळवारी ते नवीन कार्यभार स्वीकारणार आहेत. चार वर्षांपेक्षा जास्त काळ ते विक्रीकर आयुक्त राहिले. विक्रीकर चोरी रोखण्यासाठी त्यांनी तयार केलेली योजना संजय भाटिया पॅटर्न म्हणून अनेक राज्यांनी स्वीकारली आहे. भाटिया यांनी आयएएस कारकीर्दीला औरंगाबाद येथूनच प्रारंभ केला. 1989 ते 1992 पर्यंत ते सिडकोचे मुख्य प्रशासक होते. सोलापूर जि.प.चे सीईओ, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या जागी नितीन करीर हे विक्रीकर आयुक्त म्हणून आले आहेत.