आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एसीबी’साठी पंचाचे काम करणारा हजाराची लाच घेताना अडकला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) होणाऱ्या कारवायांत पंचाची भूमिका निभावणारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायक संजय मंगलमूर्ती कुलकर्णी हाच सोमवारी एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. दुपारी बाराच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत व्यक्तीने पासपोर्टसाठी एनओसी मिळावी, यासाठी सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कारवाईसाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायक संजय कुलकर्णी याच्याकडे गेला. या कामासाठी कुलकर्णी याने वैद्यकीय अधिकाऱ्याकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दिली होती. २१ नोव्हेंबर रोजी कुलकर्णी यास हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार तोे जिल्हा परिषदेच्या कँटिनमध्ये बसला होता. दुपारी १२ वाजता तक्रारदाराकडून एक हजाराची लाच घेत असतानाच एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक विवेक सराफ, हेमंत सूर्यवंशी, निरीक्षक विकास पाटील यांनी सापळ्याचे आयोजन केले. त्यांना कर्मचारी कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, संदीप आव्हाळे, रवींद्र देशमुख, नितीश घोडके वाहन चालक दिलीप राजपूत यांनी मदत केली.
बातम्या आणखी आहेत...