आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्त संजय कुमार यांना राष्ट्रपती पदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पंचवीस वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन शहराचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले. संजय कुमार हे 1989च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
पोलिस सेवेत येण्यापूर्वी त्यांनी 1988 मध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसअंतर्गतही सेवा बजावली. देशसेवेची आवड असलेल्या संजय कुमार यांचे बिहारमधील औरंगाबादेत काही महिनेच मन रमले. जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून त्यांन सेवेस प्रारंभ केला.
आयपीएसनंतर महाराष्ट्राच्या कॅडरमध्ये त्यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय कार्य केले. इचलकरंजी, नांदेड येथे सहायक पोलिस अधीक्षक, नंतर कोल्हापूर, औरंगाबादचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. नागपूर येथे राज्य राखीव पोलिस दल आणि पोलिस उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि आता पोलिस आयुक्त म्हणून अडीच वर्षांपासून ते शहरात कार्यरत आहे. आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राइमचे सक्षमीकरण, दामिनी पथकाची निर्मिती, पोलिस कँटीनची संकल्पनाही त्यांनी येथे रूढ केली. 13 ठाणी, प्रमुख चौक आणि आयुक्तालयात सीसीटीव्ही सर्व्हिलन्स त्यांनी सुरू केले आहे. कर्मचा-यांच्या नव्या सदनिकांचे कामही त्यांच्याच काळात वेगाने सुरू झाले आहे.