आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपली लढाई निजामांच्या बापाशी- संजय राऊत यांचा भाजपला टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचे सरकार हे निझामाच्या बापाचे सरकार असल्याची थेट टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम विदेशाच्या दौऱ्यावर असतात. ६ महिन्यांपासून त्यांना सांगतोय मराठवाड्यातील दुष्काळ एक दिवस का होईना बघा; परंतु त्यांना वेळ नाही. मराठवाड्याने निझामी राजवट अनुभवलेली आहे. हे तर त्याच्या बापाचे सरकार आहे. आपली लढाई ही निझामाच्या बापासोबत आहे. तेव्हा आपल्या तलवारी घासून ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

मोदी हे बहुतांश वेळा विदेश दौऱ्यावर असतात. केरळ, तामिळनाडू येथे त्यांनी ३०-४० सभा घेतल्या. ज्या केरळात भाजपला कुत्रे विचारत नाही तेथेही दहा सभा घेतल्या; परंतु दुष्काळी मराठवाड्यात ते फिरकले नाहीत. त्यामुळेच हे सरकार निझामाच्या बापाचे आहे आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी आतापासूनच सज्ज राहायला हवे. त्यासाठी शिवसैनिकांनी सर्व प्रकारची तयारी ठेवावी, असेही ते म्हणाले. शिवसेना हा वाघ आहे.गेल्या ५० वर्षांपासून अनेकांवर पंजे मारले आहेत. पंजे इतर प्राण्यांनाही असतात, परंतु वाघाची ताकद पंजात आहे. आतापर्यंत भलेभले अंगावर घेतले, यापुढेही शेतकरी तसेच जनतेसाठी अनेकांना अंगावर घेत राहू, असेही ते म्हणाले.

आपण सत्तेत असलो तरी शिवसेनेसारखा विरोधी पक्ष दुसरा कोणताच नाही, हे सर्वजण मान्य करतात. शेतकऱ्यांसाठी आम्ही कोणाच्याही विरोधात जायला तयार आहोत. कारण शिवसेना कोणाला घाबरत नाही. शेतकऱ्यांसाठी सत्ता कुर्बान झाली तरी चालेल, पण आम्ही मागे फिरणार नाही. आमची निष्ठा ही अंबानी-अदानी यांच्याशी नव्हे तर शेतकरी व सामान्यांना केंद्रबिंदू मानलेली आहे. आम्ही त्यांच्यासाठीच काम करतोय. त्यामुळेच आता निवडणूक झाली तर शिवसेनेला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील. त्यात मराठवाड्याचा वाटा मोठा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे कसले सेलिब्रेशन ? :
शेतकरी आत्महत्या करत असताना हे सरकार दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उत्सव साजरा करतेय. विशेष म्हणजे त्यांचे तेच साजरे करताहेत. सरकार असे असावे की मतदारांनी जयजयकार करावा, परंतु येथे त्यांच्यातच सेलिब्रेशन सुरू आहे, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली.

... तेव्हा एकनाथ खडसेंना ‘अच्छे दिन’ कळतील!
भाजपमधील बुडबुडे आता बुडायला लागले आहेत.जे शिवसेनेच्या नादाला लागले ते संपले. शिवसेनेसोबत युती नको म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंचा बुडबुडा कोठे आहे? खडसेंच्या मागे जेव्हा कोर्ट-कचेऱ्या लागतील तेव्हा अच्छे दिन म्हणजे काय, हे त्यांना उमगेल. असे अनेक बुडबुडे लवकरच गायब होतील, असे राऊत म्हणाले.
औरंगजेब हाेऊ नका
तहानलेल्या मराठवाड्याला पाणी देऊ नका म्हणून नाशिकमध्ये मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेने इतरांना ‘निझाम’ म्हणताना आपण स्वत: मात्र ‘औरंगजेबासारखे’ वागू नये,’ असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते व अामदार राम कदम यांनी िशवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आणखी काय म्‍हणाले संजय राऊत..
बातम्या आणखी आहेत...