आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या तिजोरीत "सन्मान'ने घातली पाच कोटी रुपयांची भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेला मालमत्ता करवसुलीत शंभर कोटींचा पल्ला गाठता आला नसला तरी नळ ग्राहकांनी पाणीपट्टीच्या माध्यमातून सन्मानाने महापालिकेच्या तिजोरीत कोटींची भर घतली आहे. पाणीपट्टीची रक्कम थकवणाऱ्या नळ ग्राहकांना नियमित पाणीपट्टी भरता यावी यासाठी मनपाच्या मान्यतेने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून सन्मान योजना राबवली. यात तीन महिन्यांत तब्बल पाच कोटी रुपये वसुली करण्यात आल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांत ४७०० पेक्षा अधिक ग्राहकांनी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून अवघ्या दोनच महिन्यांत पाच कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही योजना ३१ मार्च २०१६ पर्यंतच होती. तिला आता मे २०१६ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ जवळपास ५६ हजार ग्राहकांना होणार आहे. यात नियमित बिल भरणा करणारे ग्राहक, नवीन ग्राहक, बल्क/ रॉ पाणी वापरणारे ग्राहक आणि इतर ग्राहकांचा समावेश नाही.

अशीआहे ग्राहकांची आकडेवारी
तीन ते दहा वर्षांपासून थकबाकी भरणारे मोठे ग्राहक अाहेत. वर्षांच्या आतील थकबाकी असलेले सुमारे ६९०० ग्राहक आहेत. त्यांची थकबाकी कोटी ९० लाख एवढी आहे. ते वर्षे कालावधीतील १६४५० ग्राहक आहेत. त्यांची थकबाकी १८ कोटी २० लाख रुपये, तर वर्षे जुने असलेले ३३,१५० ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ८६ कोटी ९५ लाख इतकी थकबाकी आहे.
सन्मान योजना कुणासाठी?
पाणीपट्टीची थकबाकी ज्यांनी भरली नाही अशा घरगुती ग्राहकांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना सुलभ ईएमआयद्वारे थकबाकी भरण्याची संधी मिळाली. ज्यांना काही कारणास्तव वेळेत बिल भरता आले नाही आणि थकबाकी वाढत असलेल्यांना योजनेचा फायदा झाला. २१ हजार ग्राहकांनी ३१ मार्चपर्यंतचे बिल भरले आहे. या योजनेमुळे ग्राहक बिलासाठीचा फॉलोअप, विनंती कॉल, थकबाकी भरा, असे पत्र आणि इतर त्रासांतून ग्राहकांची मुक्तता होईल. ही योजना मनपाच्या सहकार्यामुळे आणि कंपनीकडील उपलब्ध बॅकएंड प्रणाली, तांत्रिक पायाभूत सुविधा असल्यामुळे शक्य आहे.

मनपाचे सहकार्य महत्त्वाचे
कंपनीकडून नियमित थकबाकीदारांकडे पाठपुरावा करण्यात येत असून वसुली करण्यात आली. सुलभ हप्त्याने थकबाकी भरण्याची सुविधा दिल्याने वसुली वाढली. यात मनपाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. अविक बिस्वास, ब्रँडिंग मीडिया प्रमुख
करवसुलीत अपयश
ज्यांनी कधीच पाणीपट्टी भरली नव्हती त्यांच्याकडून खासगी कंपनीने तीनच महिन्यांत वसुली करण्यात आली. उलट मालमत्ता वसुलीत मनपाची तिजोरी तुडुंब (शंभर कोटी रुपये) भरण्याची अपेक्षा असताना ती वसूल करण्यात मनपाला अपयश आले.

मनपाला फायदा झाला
मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडे पाण्याची थकबाकी होती. कंपनीने मनपाची परवानगी घेऊन ही योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे थकबाकी असणाऱ्यांकडून तीन महिन्यांतच पाच कोटींपेक्षा जास्त वसुली झाली असून यातील मोठा हिस्सा मनपाच्या तिजोरीत जमा होणार आहे. हेमंत कोल्हे, कार्यकारीअभियंता,