आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राम गणेश: औरंगाबादकरांचे श्रद्धास्थान संस्थान गणपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्थान गणपतीला औरंगाबाद शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारे दैवत म्हणूनही याची ख्याती आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. गणेशोत्सवात तर दिवसभर भाविकांची रांग लागलेली असते. मंदिर परिसराला दहा दिवस यात्रेचे स्वरूप येते. संस्थान गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. शहरातील अनेक गणेशभक्त सकाळी संस्थान गणपतीचे दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करतात. काळ्या पाषाणाचे मूळ स्वरूप असलेल्या या मूर्तीला शेंदूर लावण्यात आला असून डाव्या सोंडेची ही मूर्ती आहे. श्री संस्थान गणपती ट्रस्टचे कार्याध्यक्ष व नगरसेवक प्रफुल्ल मालाणी म्हणाले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जेव्हा कामानिमित्त शहरात यायचे तेव्हा संस्थान गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय ते जात नव्हते. इतकेच नव्हे, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संस्थान गणपतीला नवस केला होता. त्यानंतर शिवसेनेची सत्ता आल्यावर 1991 मध्ये त्यांनी येथील गणपतीला सोन्याचा मुकुट चढवला. गणेशोत्सवात दागिन्यांनी सजवलेली मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. संस्थान गणपती ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जनजागृती अभियान, धार्मिक विषयांवर प्रबोधन आदी सामाजिक उपक्रम राबण्यात येतात.