आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ कारखाना प्रकरण साखर आयुक्तांच्या कोर्टात; निर्णयाकडे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना १८ वर्षे भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणारे सचिन घायाळ यांची कारखाना चालवण्याची शक्यता नसल्याने विद्यमान संचालक मंडळाने यंदा हा कारखाना नाशिक येथील शीला अतुल शुगर टेकला चालवण्यास दिला. या विरोधात घायाळ शुगरचे सचिन घायाळ हे कोर्टात गेले असता आज पुणे कोर्टाने कारखाना कोण चालविणार याचा निर्णय साखर आयुक्त यांनी घ्यावा, असे आदेश दिले अाहेत.   

चेअरमन तुषार शिसोदे यांनी कोर्टाने अतुल शुगर टेकलाच कारखाना चालवण्यास हारकत नसल्याचे सांगितले. तरीही पुढील अंतिम निर्णय साखर आयुक्त घेणार असल्याने कारखान्याचा प्रश्न पुन्हा एकदा किचकट होण्याची शक्यता आहे.  

पैठण येथील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला संत एकनाथ कारखाना आमदार भुमरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर सचिन घायाळ यांना चालवण्यास दिला. मात्र दोन वर्षांतच घायाळ, भुमरे यांचे आर्थिक मुद्द्यावरून चांगले फाटल्याने घायाळ यांनी स्वत: माजी आमदार वाघचौरे, तुषार शिसोदे यांना बरोबर घेऊन कारखान्यावर आपला झेंडा लावला. मात्र सचिन घायाळ हे कारखाना चालवण्यास सक्षम नसल्याचे कारण पुढे करत विद्यमान संचालक मंडळाने घायाळ यांना अंधारात ठेवत अतुल शुगर टेकला चालवण्यास दिला. 
 
आम्हाला न्याय मिळेल 
कोर्टाने साखर आयुक्तांकडे  संत एकनाथचा प्रश्न सोडवण्यास सांगितले अाहे. आम्ही कारखाना चालवण्यास सक्षम असल्याने साखर आयुक्तांकडे आम्हाला न्याय मिळेल. 
- सचिन घायाळ, चेअरमन घायाळ शुगर, पैठण
 
कामगारांचा विजय झाला
कोर्टाने अतुल शुगर टेकला हा कारखाना चालवण्यास काही हरकत नसल्याचे सांगितले. घायाळ यांनी जी स्थगिती कोर्टात मागितली होती, ती कोर्टाने दिली नसल्याने, शेतकरी कामगाराचा विजय झाला आहे.   
- तुषार शिसोदे, चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, पैठण
बातम्या आणखी आहेत...