आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Eknath Sugar Factory Paithan Employee On Strike

दोन महिन्यांपासून वेतनासाठी कामगारांचे काम बंद आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा १८ वर्षांसाठी सचिन घायाळ शुगर लि. शी करार झाला आहे. करार झाल्यानंतर तरी कामगाराचे पगारासाठीचे काम बंद आंदोलन थांबेल, असे वाटले होते. मात्र, दोन महिन्यांपासून थकीत पगारासाठीचे सुरू असलेले आंदोलन मिटताना दिसत नाही.

करारानंतरही कारखाना कामगाराचे पगारच होत नसल्याने हा कारखाना बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घायाळ शुगरने आंदोलन काळातील पगार देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंदोलन आणखी सुरूच ठेवण्याची भूमिका कामगार नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे कामगार कारखान्याच्या वादात तालुक्यातील हजार टन उसाचा प्रश्न गंभीर होणार आहे.
संत एकनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला कारखाना स्वत:च्या हिमतीवर चालवता आला नाही. त्यामुळे मुंडे नंतर हा कारखाना कोणी चालवण्यास घेत नसल्याने एकनाथच्या संचालकांना ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याच्या ४०० कर्मचाऱ्यांनी कारखाना सुरू करण्याचा दबाव वाढवला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कारखाना सुरू करणे आवश्यक झाले होते. त्यामुळे एकनाथच्या संचालकांनी हा कारखाना सचिन घायाळ यांना १८ वर्षे भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचे जाहीर केले. त्यावर एक वर्षे कारखाना सचिन घायाळ शुगरने चालवला. मात्र करार होत नसल्याने कामगारांत चिंता वाढली होती. अखेर एक महिन्यापूर्वी कारखान्याचा करार झाला. पण, त्यादरम्यान एक महिन्याचे वेतन घायाळ शुगरकडे थकीत असल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन मागे घ्या पगार देतो, अशी भूमिका घायाळ शुगरने घेतली. मात्र, काही कामगार नेते यांनी आम्हाला जास्तीची रक्कम द्या, अशी मागणी केल्याने आपण कामगार नेते यांचे लाड पुरवणार नाही, असे घायाळ यांनी सांगत त्या एक महिन्याचा पगार केला नाही. आता दोन महिन्यांपासून कामगारांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आले आहे.
एकनाथच्या संचालकांचे दुर्लक्ष, संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष
कारखानाचालवता आल्याने इतराला भाडेतत्त्वावर देऊन आपली जबाबदारी झटकल्यासारखे एकनाथचे संचालक मंडळ करत असल्याचे दिसत असून कामगारांच्या पगाराच्या अडचणी सोडवण्यासाठी हे संचालक पुढाकार घेत नसल्याने कामगारांना वाली कोणी राहिला नसल्याने दोन महिन्यांपासून कामगार रोज कारखान्यावर येतात तरी त्यांच्या पगाराच्या मुद्द्यांवर एकनाथचे संचालक काहीच भूमिका घेत नसल्याने कामगाराने संताप व्यक्त केला आहे.

कामगार नेत्यांचे लाड करणार नाही
कामबंदच्या दोन महिन्यांच्या काळातील एक दिवसाचाही पगार कामगाराला दिला जाणार नाही. "काम केले तर पगार' ही भूमिका आपली राहील. कामगार नेत्यांचे फुकटचे लाड केले जाणार नाहीत.
-सचिन घायाळ, घायाळ शुगर, पैठण

कारखाना बंद राहिल्यास दोनशे कोटींचा फटका
हा कारखाना 400 कर्मचाऱ्यांसह एक हजाराहून अधिक अन्य कामगाराला दरवर्षी रोजगार मिळत आहे. शिवाय जवळच्याच कारखान्याला ऊस वेळेत जातो. त्यामुळे सहा महिन्यांची उलाढाल दोनशे कोटींच्या वर होते. यंदा तो बंद राहिल्यास ही उलाढाल थांबली जाण्याची शक्यता आहे. कामगार नेत्यांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यासाठी घायाळ शुगरने प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. मात्र, काही कामगार नेते आंदोलन मागे घेत नसल्याने घायाळ शुगर ने स्पष्ट केले. यासंदर्भात कामगार रमेश जाधव यांनी आमचा पगार द्या, काही कामगार नेत्यांमुळे आम्ही उपाशी राहावे काय, अशी प्रतिक्रिया दिल्याने आंदोलनात दोन गट पडण्याची शक्यता आहे.