आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Gadgebaba Sanitation Program News In Divya Marathi

मोदींच्या पहिले या संताने दिला स्वच्छतेचा संदेश; जाणून घ्या, त्यांच्या विषयीच्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत गाडगे बाबा हातात खराटा घेऊन गाव झाडताना...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका दौर्‍यातून परतले आहेत. अमेरिका दौर्‍यात त्यांनी अमेरिकेतील मेडिसन स्क्वेअर येथे भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणात स्वच्छतेचा संदेश दिला होता. तसेच हे स्वच्छता अभियान मी भारतात परतल्यावर सुरू करणार असल्याचे सांगितले होते. आज २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी या अभियानाला सुरूवात केली आहे. मात्र स्वच्छतेचा संदेश देणारे नरेंद्र मोदी हे काही पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वीही अनेकांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे आणि यात सर्वोच्च स्थानावर आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे सुपूत्र राष्ट्रसंत गाडगेबाबा.

"तीर्थी धोंडापाणी, देव रोकडा सज्जनी" असा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी दीन, दुबळ्या, अनाथ अपंगाची सेवा करतच आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. गाडगेबाबांजवळ सतत एक खराटा असायचा. तसेच अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे अशी त्यांची वेशभूषा असायची. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. गाडगेबाबा ज्या गावात जात तेथे सर्वात पहिले ते गाव झाडून स्वच्छ करत. त्यानंतर गावातील सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी ते स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
गाडगेबाबा यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील हे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान' चालवले होते. तसेच त्यांच्या नावाने राज्य सरकार पुरस्कारही देते.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.
३) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.
पुढील स्लाईडवर वाचा, संत गाडगेबाबा यांच्या जिवनाबद्दल आणि पाहा त्यांचे दुर्मिळ फोटो...
फोटो सौजन्य - फेसबुक
माहिती संकलन - विकिपेडीया