आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपुत्र ग्रुपतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवपुत्र ग्रुपच्या वतीने गुरुवारी (१९ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता सिडकोतील संत तुकोबाराय नाट्यगृहात शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त व्याख्यान, रक्तदान, रोपवाटप व अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून नगरसेवक समीर राजूरकर, इतिहासतज्ज्ञ अरुण वाहूळ, स्वप्निल घुमरे आदींची उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक किशोर नागरे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अमेय शिंदे, आदित्य ठोंबरे व शुभम राऊत यांनी केले आहे.