आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागेवरच ब्लॅक होल मशीन लावेल कचऱ्याची विल्हेवाट, शहर पर्यावरण समृद्धीसाठी ठरेल उपयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 औरंगाबाद- शहरातील११५ वॉर्डांत दररोज सुमारे साडेचारशे टन कचरा निघतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मनुष्यबळ आणि वाहनाचा वापर केला जातो. यासाठी दरमहा तीन कोटींवर खर्च होतो. नारेगावला कचरा पडून राहत असल्याने दुर्गंधी सुटून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हासही होत आहे. कचऱ्याची जागीच राख करणारे “ब्लॅक होल’ यंत्र खरेदीसाठी मनपा तसेच औद्योगिक क्षेत्राने उत्सुकता दाखवली आहे. 
 
देश-विदेशात कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जात आहे. ब्लॅक होल टीएम हे कचऱ्याची राख करणारे यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे मशीन पेट्रोल, डिझेल, रॉकेल, विजेशिवाय चालते. म्हणजेच ते मॅग्नेटिक पॉवरवर चालते. काचेची बॉटल, मेटल आणि स्टील वगळता टायर, ट्यूब, प्लॅस्टिक, उष्टे शिळे अन्न, कचरा, पेपर, प्लास्टिक बॉटल, कचरा इतर सर्व कचऱ्याची काही वेळेतच ते राख करते. १५१ देशांत हे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे.
 
देशात दिल्ली, हैदराबाद, कर्नाटक, मुंबई, नागपूर, पुणे आदी शहरांत कचऱ्याची राख करणारे मशीन बसवण्यासाठी परिनिश्ता इको सोल्युशन्स कंपनीकडून बोलणी सुरू असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमेन डिलोन, संचालक सिद्धार्थ हेमाडी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. 
 
हा होईल फायदा : एकटन ते ५० टन क्षमतेच्या मशीन आहेत. त्या मोबाइल व्हॅनद्वारे एकेका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाता येतात. म्हणजेच वॉर्डातील कचरा जागच्या जागेवर नष्ट करणे शक्य होईल. कचरा जाळल्याने धुरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो; पण तो या मशीनमध्ये टाकल्यास धूर केवळ टक्केच बाहेर पडतो. म्हणजेच ९७ टक्के प्रदूषण कमी होईल. हवा, पाणी, जमीन आणि भूजल प्रदूषण थांबवण्यास मदत होईल. मनुष्यबळ, वाहनाद्वारे कचरा वाहून नेण्याचा खर्च वाचेल. शिवाय स्वच्छता कामगारांचे आरोग्य अबाधित राहील. कचरा डेपोचीही गरजच उरणार नाही. 
 
- २१०० कर्मचारी, स्किपलोडर, हूकलोडर ट्रॅक्टर अशा २६ वाहनांद्वारे दिवसभरात ४५० टन कचरा उचलला जातो. यावर खर्चही मोठ्या प्रमाणावर होतो. कचरा साठवल्याने तो सडून दुर्गंधी सुटते. कचऱ्याची राख करून तो नष्ट करण्यासाठी अद्ययावत यंत्र खरेदीचे नियोजन केले जात आहे. -विक्रम मांडुरके, उपायुक्त, घनकचरा विभाग, मनपा. 
 
अद्ययावत मशीन ठरेल जालीम उपाय 
शहरात निघणाऱ्या कचऱ्याची दररोज विल्हेवाट लावली जात नाही. नारेगाव डेपोत कचरा कुजून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत आहे. न्यायालयाने कचरा डेपो हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याची मनपा प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही. कचरा डेपोसाठी इतर ठिकाणी जागेचा शोधही घेतला गेला; पण नागरिकांचा तीव्र विरोध झाल्याने यश आले नाही.
 
प्रदूषणात शहराचा दुसरा क्रमांक लागतो. कचऱ्यामुळे संसर्गजन्य रोग होतात. त्यामध्ये त्वचा विकार, फुप्फुसाचे आजार, गॅस्ट्रो, उलटी, अॅसिडिटी, डोकेदुखी, सर्दी यासारख्या आजारांचा समावेश आहे. यावर मात करण्यासाठी कचऱ्याची राख करणारे मशीन जालीम उपाय ठरेल, असा विश्वास उद्योजक आनंद दरक यांनी व्यक्त केला. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...