आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा वर्षांनंतर "सारा'वासीयांना मिळाले महानगरपालिकेचे पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागीलबारा वर्षांपासून हक्काच्या पाण्यासाठी लढणाऱ्या सारावासीयांना प्रजासत्ताकदिनी प्रशासनाकडून मोठी भेट मिळाली. सुमारे ५०० कुटुंबीयांच्या या वस्तीला पालिका हद्दीत असूनही १२ वर्षांपासून पाणी मिळत नव्हते. अखेर नगरसेविका ज्योती अभंग यांच्या पुढाकाराने पाणी मिळाले असून नागरिकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
१४ जानेवारी रोजी वाॅर्ड क्रमांक मधील नागरिकांनी पाण्यासाठी नगरसेविका अभंग यांचे घर गाठले होते. त्याच दिवशी अभंग यांनी महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनात जाऊन कळकळीने ही समस्या मांडली होती. त्यानंतर १५ जानेवारी रोजी आयुक्तांनी या भागातील सारा वैभव, राजनगर, म्हाडा कॉलनी, हर्सूल तलावाची पाहणी करून २२ तारखेपर्यंत या भागाला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आणि सारावासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पाणी मिळाले. पाणी येताच नागरिकांनी एक समारंभ आयोजित करत अभंग आणि मनपा आयुक्तांचे आभार मानले. नगरसेविका ज्योती अभंग आणि आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आभार मानले. या वेळी कामगार नेते गौतम खरात, अशोक हिवराळे, जयेश अभंग, राजेंद्र वाणी, नरेंद्र देशमुख सुगचंद परदेशी, सतीश पवार, किशोर म्हस्के, हरीश खटावकर, राधेश्याम चांडक, महापालिकेचे कर्मचारी फुले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाऊसाहेब सातदिवे, करण हिवराळे, मनोज जाधव, गणेश शेळके, डी. एम. राजपूत यांनी परिश्रम घेतले.

बिल्डरची पोलखोल : या गृहप्रकल्पांना महापालिकेचे पाणी आहे, असे सांगून बिल्डरने सुमारे ४०० घरांची विक्री केली होती. २००६ - ०७ मध्ये काही दिवसांकरिता कनेक्शन जोडण्यात आले. मात्र, आठच दिवसांत पाणी बंद झाले. त्यानंतर येथील रहिवासी सोसायटीतील विहिरीवरून पाणी भरत होते. तसेच बाजूच्या शेतकऱ्याला विनंती करून दर महिन्याला आर्थिक मोबदला देऊन पाणी विकत घेत. तसेच पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेत. उन्हाळ्यात तर प्रत्येक घरासमोर टँकर उभे राहत होते. बिल्डरने प्रशासनदरबारी या गृह प्रकल्पाची नोंद सेल्फ डेव्हलप सोसायटी अशी केल्यामुळे अधिकारीदेखील त्यांच्या समस्येकडे कानाडोळा करीत.