आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarafa Association Protests The Government's Decision

सराफा संघटनेकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जानेवारी २०१६ पासून दोन लाख रुपयांचे सोने खरेदीवर केंद्र सरकारने पॅन कार्ड सक्तीचे केले आहे. ही अट अत्यंत जाचक असल्याचे मत व्यक्त करीत शहरातील सराफा संघटनेने केंद्र सरकारच्या निर्णयाचा मेणबत्त्या पेटवून प्रतीकात्मक निषेध केला.
जानेवारीपासून लाख रुपये त्यापेक्षा जास्तीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या पॅन कार्डाची नोंद सहा महिने दुकानदारांना सांभाळून ठेवावी लागणार आहे. ग्राहकाकडे पॅन कार्ड नसेल तर सरकारने दिलेले फॉर्म नं. ६०, ६१ ६१- ६१- भरून घ्यावेत, असा कायदा केला आहे. सुवर्णकारांना हा कायदा सक्तीचा आणि जाचक असल्याचे मत व्यक्त करीत शहरातील सराफा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सात वाजता मेणबत्त्या जाळून प्रतीकात्मक निषेध नोंदवण्यात आला. मंगळवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.