आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : सारिकाच्‍या \'त्‍या\' मावशीने आणखी पाच मुलींना विकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात एका ऊस कामगाराच्या मुलीची अवघ्या 1 लाख 20 हजारांना विक्री केल्याची धक्कादायक घटना ताजी असताना, आता आणखी पाच मुलींची विक्री केल्याची कबुली या प्रकरणातील आरोपींनी दिली आहे. यापैकी तीन मुलींना गुजरातमध्ये तर, दोन मुली महाराष्ट्रात विकल्या असल्‍याची माहिती समोर आली आहे.
सारिका अग्रवाल या विवाहितेच्या छळाच्‍या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. सारिकाच्या मानलेल्या मावशीने तिची विक्री 1 लाख 20 हजार रुपयांना केली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी सुवर्णा वंजारे, धुराजी सूर्यनारायण, विठ्ठल पवार, सुरेखा बावणे यांना 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिसारवाडीतील पिडीत विवाहितेची अवघ्‍या 95 हजार रूपयात अग्रवाल कुटुंबाला विक्री करण्‍यात आली होती. त्‍यानंतर पिडितीने मानलेल्‍या मावशी व मावस मामाने माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्‍य केले आहे. या प्रकरणी आरोपींवर मानवी तस्‍करी कायद्यांतर्गत अटक करण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा..
- हाजी अली दर्गा बंदी, मुस्लिम महिला संघटना हायकोर्टात
- ठाणे-सूरज परमार प्रकरणाला नवीन वळण
- गडचिरोली -32 लाखांचे बक्षीस असलेल्‍या आठ नक्षलवाद्यांचे आत्‍मसमर्पण
- ठाणे -रूग्‍णवाहिकेच्‍या स्‍फोटात नवजात बालकाचा मृत्‍यू
- मुंबई - चंबळच्या खोऱ्यातील लुटारुंपेक्षा जास्त लूट ‘आरटीओ’मध्ये - गडकरी