आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarpanch Nahida Bano Cast Certificate Illegal Aurangabad

सरपंचाचेही जात प्रमाणपत्र ठरले अवैध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जि.प.च्या सातारा सर्कलच्या सदस्या नाहिदाबानो पठाण यांना अधक्षपदाबरोबरच सदस्यत्वही गमवावे लागले. त्यानंतर लगेचच सातार्‍याचे सरपंच अलका शिरसाट यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याने त्यांचेही पद गेले. सातारा ग्रामपंचायतीचे लवकरच नगर परिषदेत रूपांतर होणार असल्याने यापुढे येथे जिल्हा परिषद सदस्य असणार नाही की सरपंच. त्यामुळे या दोन्हीही पदांवर दुर्दैवी गंडांतर आले आहे. येत्या 27 ऑक्टोबरला येथील सर्कलची निवडणूक होत असून यात विजयी झालेल्या उमेदवार या सातारा सर्कलच्या शेवटच्या जि.प. सदस्य असणार आहेत. शिरसाट यांचे सरपंचपद रद्द करण्याविषयीची तक्रार कैलास पवार, राजेंद्र नरवडे, शकुंतला साबळे आणि ईश्वर साबळे यांनी केली होती. आधी अपर जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी झाली. त्यात हा अर्ज फेटाळण्यात आला होता. याविरोधात विभागीय अपर आयुक्तांकडे आव्हान देण्यात आले. अपर आयुक्त गोकुळ मवारे यांनी शिरसाट यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा दिला.