आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील एकमेव सरस्वती मंदिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नमामि शारदादेवीम्, वीणा पुस्‍तकधारिणीम्
विद्यारंभम् करष्‍यामि, प्रसन्‍नास्‍तुच सा सदा


या संस्कृत सुभाषिताप्रमाणे कोणतीही विद्या आत्मसात करायची असेल तर सरस्वती देवीचे आशीर्वाद हवे असतात. त्यासाठी या देवीची स्तुती केली जाते. वरील सुभाषित म्हटल्यानंतरच विद्यारंभ केला जातो. विद्यार्थी दशेत असो वा व्यापारात सरस्वती पूजनाला वेगळाच मान आहे. ही पूजा पाडव्याच्या दिवशी पर्वकालात करण्याची परंपरा आहे. अशा या सरस्वतीचे मंदिर मात्र कोठे दिसत नाही. सुदैवाने देशातील तीन मोजक्याच मंदिरांपैकी सरस्वतीचे एक मंदिर आपल्या शहरात आहे. पाडव्यानिमित्त या मंदिराची माहिती देऊन विशेष दखल घेत आहोत.

रेल्वेस्टेशन रोडवरील हमालवाडी येथे अगदी रस्त्यावरच हे मंदिर आहे, परंतु हे सरस्वतीचे मंदिर असल्याची माहिती मात्र फार मोजक्या लोकांनाच आहे.

विद्येची देवता असणार्‍या या मंदिराची कथाही रंजक आहे. हमालवाडी येथील अत्यंत भाविक असणार्‍या पाचंगरे कुटुंबीयांच्या प्रयत्नातून हे मंदिर उभे राहिले आहे. विशेष म्हणजे एका महिलेनेच हे मंदिर बांधले आहे.

बासरला संकल्प झाला
पाचंगरे कुटुंबीय 2009 मध्ये तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. रस्त्यात ते सरस्वतीचे मंदिर असणार्‍या आंध्र प्रदेशातील बासर शहरात उतरले. योगायोगाने त्या दिवशी कोजागरी पौर्णिमा होती. कोजागरीला बासरच्या मंदिरात मोठा उत्सव असतो. देशभरातून भाविक येथे येतात. पाचंगरे मंदिरात दर्शनासाठी गेले. तेथील वातावरण पाहून मोहन यांच्या आई डॉ. रत्नप्रभा बोरसे भारावून गेल्या. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आपणही औरंगाबादला सरस्वती देवीचे मंदिर बांधायचे असा संकल्पच तत्क्षणी त्यांनी केला. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...