आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सटाणा-चिंचपाडा रेल्वेमार्ग सर्वेक्षणास 15 लाखाची तरतूद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा: सटाणा-साक्री-चिंचपाडा या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी दिली.
नाशिक-सिन्नर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी रेल्वेमंत्रालयाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला होता. मनमाड-मालेगाव-सटाणा-साक्री- चिंचपाडा हा गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असून, या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करून तो प्रस्तावित करावा, अशी मागणी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. याबाबत संबंधित खात्याने सकारात्मक भूमिका घेऊन अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे देशांतर्गत बाजारपेठांबरोबरच दळणवळण विकासाला चालना मिळणार असून, जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी, अंतापूर येथील दावलमलिक, शंकर महाराज, साल्हेर मुल्हेरचे ऐतिहासिक किल्ले यांचे तीर्थाटन करणार्‍यांची गैरसोय दूर होणार आहे. भाजीपाला गुजरात राज्यात विक्रीसाठी नेणार्‍यांची सोय होणार आहे. मनमाड- सुरत रेल्वेमार्गाचे अंतर 370 कि.मी. असून, या प्रस्तावित मार्गाचे अंतर फक्त 170 कि.मी. असून, अंतर 200 कि.मी. ने कमी होऊन इंधनात बचत होणार आहे.