आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यातील ४३२ घरांमध्येही पुन्हा लखलखाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाळूच्या टिप्परने विजेच्या खांबामुळे अंधारात असणाऱ्या सातारा परिसरातील सर्व घरांचा वीज पुरवठा गुरुवारी दुपारी सुरळीत झाला. बीड बायपासवरील गोदावरी ढाब्याजवळील विजेच्या खांबाला बुधवारी रात्री टिप्परने धडक दिली होती. त्यामुळे पहाटे अडीचपासून या भागातील ८३२ घरांसह हॉटेल्स, दुकानांचा वीजपुरवठा ठप्प होता.

स्थितीचे गांभीर्य ओळखून सकाळी सातपासूनच महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम सुरू केली. २० कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सहा नवीन खांब उभारून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काम करत ४०० घरांचा विजेचा प्रश्न सोडवला. मात्र, उर्वरित भागातील नागरिकांना मात्र विजेअभावी अडचणींचा सामना करावा लागला.

शुक्रवारीही मोहीम
महावितरण कर्मचाऱ्यांनी शुक्रवारीही सकाळपासूनच कामाला प्रारंभ करून दुपारी साडेतीनपर्यंत ही समस्या पूर्णपणे सोडवली. त्यामुळे सर्व ८३२ घरांसह, हॉटेल्स, दुकानांत पुन्हा लखलखाट झाला. दरम्यान, वीज पुरवठा सुरळीत होताच गुरुवारी सकाळपासून खोळंबलेली कामे करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली. दुकाने, कार्यालयातील व्यवहारही सुरू झाले. दरम्यान, या मोहिमेसाठी दीड लाखांचा खर्च आल्याची माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहाद्दूर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...