आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद महापालिकेतील सातार्‍यासाठी सहा महिन्यांत स्वतंत्र नगर परिषद!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराचा भाग असला तरी औरंगाबाद महापालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या सातारा परिसरासाठी येत्या सहा महिन्यांत स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची तयारी शासन दरबारी सुरू झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून शासनाकडे प्रलंबित जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर 15 ऑगस्टदरम्यान अधिसूचना जारी होऊ शकते, असे सूत्रांनी म्हटले आहे.


नागरिकांच्या हरकती मागवण्यासाठी आवश्यक प्रगटनाचा मसुदा शासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे. तो शासनाकडे परत गेल्यानंतर आक्षेपासाठी जनतेला कालावधी दिला जाईल. ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. सातारा ग्रामपंचायत परिसराची लोकसंख्या 50 हजारांवर असून, प्रस्तावित नगर परिषदेची सीमा कशी असेल हे अधिसूचनेनंतरच स्पष्ट होईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीच सातारा नगर परिषदेची निवडणूक होईल, अशी अटकळ आहे.

दोन मतप्रवाह असे
मनपात समावेश करा, यामुळे शहराचे भावी नियोजन सोयीचे होईल.

स्वतंत्र नगर परिषद हवी. पालिका हद्दीत समावेश झाल्यास कराचा बोजा वाढेल. यामुळे न.प.च बरी.

महिनाभरात जाहीर प्रगटन
जाहीर प्रगटनाचा मसुदा जिल्हा प्रशासन शासनाकडे पाठवील
प्रगटन प्रसिद्धीस दिले जाईल. हरकती मागवल्या जातील.
नंतरच स्वतंत्र नगर परिषद निर्मितीवर शिक्कामोर्तब होईल.
महिनाभरात हे प्रगटन प्रसिद्धीस दिले जाण्याची शक्यता.