आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा पोटनिवडणुकीचे आरक्षण व सीमा जाहीर; देवळाई वॉर्ड ११४, तर सातारा वॉर्ड ११५

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई महानगरपालिका पोटनिवडणुकीसाठी आरक्षण व सीमा -हद्द जाहीर झाली आहे. दोन वॉर्डांसाठी ही निवडणूक होत आहे. देवळाई व साताऱ्याचा काही भाग सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाला आहे, तर सातारा गाव व तांडा परिसर अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे. या दोन वाॅर्डांची विभागणी रेणुकामाता मंदिर कमानीपासून करण्यात आली आहे.
चाटे स्कूलमार्गे बीडबायपास रोडवरील रेणुकामाता मंदिराची कमान नव्या वॉर्डांची सामान्यत: हद्द राहणार आहे. त्यामुळे परिसराची मधूनच अनपेक्षित फोड झाल्याने वॉर्ड हद्दीसंदर्भात अनेक आक्षेप नोंदवले जाण्याची शक्यता राजकीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली गेली.

अस्तित्वच संपवण्याचा घाट : सातारा देवळाईचा पालिकेत समावेश केल्यानंतर शहरातील आजी-माजी तसेच यंदा संधी हुकलेल्या बड्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात होते. सातारा गावात एसटीचा एकही प्रबळ दावेदार नसून देवळाई व सातारा परिसराचा भाग पाहता सर्वसाधारण मतदारांसाठी शहरातील कुठलाही उमेदवार दिल्यास निवडून येण्याची चिन्हे जास्त आहेत. एकीकडे उमेदवार नसल्याने तर दुसरीकडे ठराविक मताधिक्यामुळे शहरातून उमेदवार नेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अस्तित्वच संपवण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला असल्याचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.

वॉर्ड क्रमांक ११४
>देवळाई व सातारा भाग - लोकसंख्या २७ हजार ७७४
>देवळाई-सातारा भागामध्ये देवळाई, सातारा भाग, ऊर्जानगर, साईनगर, सत्कर्मनगर, रेणुकापुरम, ज्ञानेश्वरनगर,
>पांडुरंगनगर, वेणुसुत कॉलनी, दिशा घरकुल,विजयंतनगर व वसंत विहार.

अशा असतील सीमा वॉर्ड ११४ ची सीमा
उत्तर -उत्तरेेकडून बीड बायपास रेणुकामाता कमानीपासून हॉटेल शेर-ए-पंजाबच्या उत्तरेकडील संरक्षित भिंतीमार्गे हिवाळे पाटील लॉन्सच्या उत्तरेकडील नाला. नाल्यामार्गे रेल्वे पटरीमार्गे शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेटमार्गे आशानगर रेल्वे पटरीजवळील सीताराम आवारे यांच्या घराजवळील रेल्वे पटरीपर्यंत. यामार्गे पुढे गारखेडा सर्वे क्रमांक ३९ मधील पालिकेची जुनी हद्द मार्गे बाळापूर शीवपर्यंत उत्तर दिशा असणार आहे. पूर्व- उत्तर-पश्चिम बाळापूर शीव ते बाळापूर कमानमार्गे बाळापूर शीवपर्यंत राहणार. दक्षिण- दक्षिण बाजूने सिंदोन भिंदोन शीवपर्यंत राहणार आहे. पश्चिम- पश्चिम बाजूकडून सातारा दक्षिण बाजू नालामार्गे म्हाडा वसाहत. दक्षिण बाजूला असलेली सेप्टिक टँकजवळील डांबरी रस्त्यामार्गे सरस्वती मंदिरसमोरील रस्त्यापर्यंत असून म्हाडा वसाहत ते पश्चिम बाजूने रस्तामार्गे गट क्रमांक २१७ मार्गे सातारा-देवळाई रस्त्यावरील श्रीराम डेली निड्सपासून पश्चिमेकडून डांबरी रस्त्यामार्गे अहिल्याबाई होळकर चौक ते उत्तरेकडील डांबरी रस्त्यामार्गे चाटे स्कूल, रेणुकामाता मंदिर, बीड बायपास रोडपर्यंत राहणार आहे.

वॉर्ड क्रमांक ११५
>सातारा गाव व सातारा तांडा- लोकसंख्या २५ हजार १४२
सातारा गाव व तांडा या वॉर्डामध्ये सुधाकरनगर, अप्रतिम परिसर, महात्मा फुले हाउसिंग सोसायटी, शिवनगर, आर.बी.सी. केसर, सोनियानगर, रोहिदास कॉलनी, आमदार रोड, मधुमंगल कार्यालय परिसर, एकता कॉलनी, शाहू महाराज शाळा परिसर, बुद्धविहार परिसर, लक्ष्मी कॉलनी, भीमवाडी, श्रद्धा विहार, दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसर, गरवारे सोसायटी, हायकोर्ट कॉलनी, पेशवेनगर, प्रभुनगर, रेणुका हायस्कूल परिसर, पंचवटीनगर, विद्यानगर, संग्रामनगर, सूर्यदीपनगर बँक कॉलनी, टेलिफाेन भवन परिसर, मीनाताई ठाकरेनगर.

वॉर्ड ११५ ची सीमा
उत्तर - उत्तरेकडील बीड बायपास रस्त्यावरील पूल (सहारा ट्रेडर्स) पासून नाल्यामार्गे दर्गा हजरत शहा शोक्ता कब्रस्तानपर्यंत राहणार आहे. उर्वरित बाजू कब्रस्तान पुलापासून जुनी मुस्तफाबाद गट क्रमांक ४ येथील मार्व्हल नेस्ट ईस्ट बिल्डिंगपासून जुनी मनपा दक्षिणेकडून बीड बायपास रोडवरील रेणुकामाता कमानपर्यंत असेल. पूर्व - बीड बायपास रोडवरील रेणुकामाता कमानपासून चाटे स्कूलमार्गे अहिल्याबाई होळकर चौकातील सोनवणे यांच्या मातोश्री बंगल्यापर्यंत असून यामार्गे सातारा-देवळाई रस्त्यावरील श्रीराम डेली निड्सपासून गट क्रमांक २१७ मार्गे म्हाडा वसाहत पश्चिम बाजूच्या रस्त्यामार्गे सरस्वती मंदिरासमोरील डांबरी रस्त्यामार्गे म्हाडा वसाहतीच्या दक्षिण बाजूच्या सेप्टिक टँकजवळील नाल्यामागून गिरनार तांड्याच्या शीवपर्यंत असणार आहे. दक्षिण - दक्षिण बाजू गिरनार तांड्याची शीवपर्यंत राहणार. पश्चिम- पश्चिम बाजूस कांचनवाडी येथील इटखेडाजवळील जुनी पालिकेची हद्दमार्गे बीड बायपास रस्त्यावरील पुलापर्यंत (सहारा ट्रेंडर्स) असणार आहे.