आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा पोटनिवडणूक ऑगस्टमध्ये होणार, प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाची मान्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला शासनस्तरावर वेग आला आहे. २२ जून रोजी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रस्तावास आयोगाने मान्यता दिली आहे. पोटनिवडणूक ऑगस्टच्या दुस-या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

जूनच्या सुरुवातील आयोगाच्या वतीने वॉर्ड आरक्षण घोषित करण्यात आले. यामध्ये एक वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी, तर उर्वरित अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आला. त्यानंतर पालिकेने दोन वॉर्डांची प्रभागरचना पाठवली असून यासंदर्भात प्रभाग रचनेचे प्रारूप १ जुलै रोजी प्रसिद्ध
करण्यात येणार आहे. दोन वॉर्ड झाल्यामुळे वॉर्डरचना नेमकी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातारा व देवळाई अशा स्वतंत्र भौगोलिक परिस्थितीनुसार दोन वॉर्ड होतील, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु सातारा गाव, सातारा तांडा परिसर या भागांचा एका वॉर्डात समावेश करण्यात येत असून उर्वरित सातारा परिसर व देवळाईचा समावेश दुस-या वॉर्डात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऑगस्टचा मुहूर्त : वॉर्ड आरक्षण, प्रारूप अधिसूचना व त्यानंतर हरकती व सूचना मागवण्यात आल्याने ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.

असे असेल वेळापत्रक
>१ जुलै रोजी प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
>१ जुलै ते ७ जुलैदरम्यान आराखड्यावर सूचना व हरकती नोंदवल्या जातील.
>१० जुलै रोजी हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...