आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Satara Deolai Municipal Council 25 Wards Reservation Declared

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गजांचे स्वप्न भंगले, सातारा-देवळाई नगर परिषदेच्या २५ प्रभागांचे आरक्षण जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माजी सरपंच यशवंत कदम, ग्रामपंचायत सदस्य करीम पटेल, शिवसेनेच्या पदाधिकारी सविता कुलकर्णी यांच्यासह अनेक दिग्गजांचे सातारा - देवळाईतील पहिला नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न आज भंग पावले. मंगळवारी (३ फेब्रुवारी) झालेल्या आरक्षण सोडतीत त्यांचे वॉर्ड आरक्षित झाले.

सातारा- देवळाई नगर परिषदेच्या एकूण २५ वाॅर्डांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यापैकी १३ वॉर्ड महिलांसाठी राखीव आहेत. म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला या नगर परिषदेचा कारभार पाहाणार आहेत. १४ पैकी ७ महिला अनारक्षीत संवर्गातील असतील.
जातीनिहाय मागास प्रवर्गास ७ जागा : मागास प्रवर्गासाठी ७ वॉर्ड राखीव असतील. त्यातील चार महिलांसाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी ४ वॉर्ड आहेत. त्यातील २ महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी १४ वॉर्ड असून त्यातील सात महिलांकरिता आहेत.

अनुसूचित जमातीला संधी नाही : सातारा-देवळाईत अनुसूचित जमातीची अपेक्षित लोकसंख्या नसल्याने येथील एकही वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला नाही.
महापालिकेचे स्वप्न : मंगळवारी नगर परिषदेच्या कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे औरंगाबाद महापालिकेत साता-याचा समावेश करण्यावर चर्चा सुरू होती. तसे झाले तर महापालिकेचा नगरसेवक होण्याच्या आशेने राजकीय कार्यकर्ते आले होते.

मनसुब्यावर पाणी फेरले
ग्रामपंचायतीत सरपंच, सदस्य, उपसरपंचपद भूषविलेल्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित झाले. माजी सरपंच यशवंत कदम यांच्यासह राजू नरवडे, करीम पटेल, हकीम पटेल, बहादूर पटेल आदी मंडळी त्यांच्या परंपरागत वॉर्डातून लढू शकणार नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून अलोकनगर, ठाकरेनगरात जनसंपर्क वाढवलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी सविता कुलकर्णी यांनाही आरक्षणाने धक्का दिला. मात्र, काँग्रेसचे नेते फिरोज पटेल यांना सातारा गाव वॉर्ड खुला मिळाला.

साता-याची वाटणी
ग्रामपंचायतीच्या काळापासून निवडणुकीत चर्चेचा विषय असलेल्या सातारा गावाची तीन वॉर्डांत विभागणी करून प्रशासनाने सर्वांनाच धक्का दिला. यातील दोन वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर एक मागासवर्गीयांसाठी राखीव राहिला. मध्यम व उच्चवर्गीयांची वसाहत असलेले आलोकनगर, आयप्पानगर, छत्रपतीनगर विभागले गेले.

देवळाईसाठी ५ वाॅर्ड
साता-यालगतचा देवळाई हा मुस्लिमबहुल भाग आहे. तेथील ५ पैकी २ वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. त्यामुळे तेथेच इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे.