आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाईकर निवडणार वॉर्डाचा पहिला नगरसेवक, शनिवारीही सुरू होता उमेदवारांचा प्रचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाई या दोन प्रभागांचा निर्णय रविवारी मतपेटीत बंद होईल. मागील तीन दिवसांमध्ये उन्हाच्या पाऱ्यामुळे प्रचार करताना उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. आता सातारा-देवळाईकर परिसराचा पहिला नगरसेवक निवडण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडतील. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी दोन्ही वॉर्डांतील प्रचार संपला. त्यानंतर शनिवारी सकाळी निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूमचे सील उघडण्यात आले. त्यानंतर मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांना साहित्याचे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी १० वाजता सर्व अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर साहित्यासह रवाना झाले. दोन्ही वॉर्ड मिळून एकूण २९ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी तर संपूर्ण बंदोबस्तासाठी १२० पोलिस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळी७.३० ते ११ सायंकाळी नंतरच मतदान बाहेर पडण्याची शक्यता : उन्हाचीतीव्रता पाहता रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मतदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी नंतर ऊन उतरताना मतदानाचा टक्का वाढेल. परंतु सकाळी ११ च्या आतच मतदानाचा पहिला टप्पा पार पडून याच टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानावर संपूर्ण निकाल अवलंबून राहील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे आव्हान सर्व पक्षांसमोर आहे.

१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातारा परिसर
२.पब्लिक हायस्कूल, शहानगर
३.रेणुकाहायस्कूल, सातारा परिसर
४.समर्थ विद्यामंदिर हेडगेवार शाळा सातारा
५.जिल्हा परिषद शाळा, सातारा तांडा
१. न्यू इंग्लिश स्कूल, अयप्पा मंदिरासमोर
२.चाटे किड्स स्कूल गट क्र. ९६, बीडबायपास रोड
३.नवीन ग्रामपंचायत कार्यालय, देवळाई गट
४.विनायक पार्क ज्ञानज्योत इंग्लिश स्कूल
५.जिल्हा परिषद शाळा, माउलीनगर
६.जिल्हा परिषद शाळा, देवळाई गाव

कार्यकर्ते सज्ज : मतदान केंद्राजवळ पोलचीट तसेच मतदारांना मदत करण्यासाठी प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी टेबल लावून बसणार आहेत. मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या अंतरावर टेबल मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे आहेत उमेदवार
देवळाई सातारा भाग (वॉर्ड क्रमांक ११४)
{हरी हिवाळे: शिवसेना
{राजू नरवडे : काँग्रेस
{अप्पासाहेब हिवाळे : भाजप
{नामदेव बाजड : राष्ट्रवादी
{पार्वती मुंदडा : अपक्ष
{शेख जियाउल्ला शेख अकबर : अपक्ष
{रवींद्र बनकर : अपक्ष
{मृणालिनी लाटकर : अपक्ष
सातारागाव, सातारा तांडा परिसर (वॉर्ड क्रमांक ११५)
{पल्लवीगायकवाड : शिवसेना
{सायली जमादार : काँग्रेस
{सुरेखा बावस्कर : भाजप
बातम्या आणखी आहेत...