आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही वॉर्डांत रस्सीखेच, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवळाईत उमेदवार दारोदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाई निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला. १५ दिवसांपसून सुरू असलेल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे काहीशी राजकीय अस्वस्थता पाहायला मिळाली. हीच अस्वस्थता आणि वाढत्या चुरशीमुळे अखेरच्या दिवशी सर्वच उमेदवार दारोदार फिरताना दिसले.
१५ दिवसांपासून धूमधडाक्यात सुरू असलेल्या प्रचारात सर्वच पक्षातील नेते अन् पदाधिकारी परस्परांवर तोंडसुख घेताना दिसले. शुक्रवारी प्रचार संपण्याच्या घाईत सेना, भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ झाली. गुरुवारी सायंकाळी झालेल्या सेनेच्या प्रचारसभेने भाजपमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा कार्यकर्त्यांत एेकायला मिळाली. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारच्या प्रचाराच्या नियोजनात बदल करण्यात आला असून युद्धपातळीवर पक्षाच्याच नावाने प्रचार करण्याचे ठरले. यासोबतच भाजपने प्रचारयंत्रणेतही बदल केला. शेवटची संधी साधत शिवसेनेनेही महत्त्वाच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत दुपारपर्यंत मतदारांच्या थेट भेटी घेण्यावर भर दिला. काँग्रेसने मात्र पूर्वीपासूनच घर ते घर प्रचार कायम ठेवत शुक्रवारी देवळाई गाव, परिसरात प्रचार केला. सेना-भाजपतील वाद आणि मतदारांची नाराजी फायद्याचीच ठरत असल्याचे सांगणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा आत्मविश्वास शुक्रवारी दुपारनंतर वाढला होता.

...प्रचाराची मुदत संपली
सेना,भाजप काँग्रेसच्या उमेदवारांनी शुक्रवारी दिवसभर घरोघरी जाऊनच प्रचार केला. भाजपतर्फे बाइक रॅलीचे नियोजन सुरू होते,;परंतु रॅलीला परवानगी मिळाल्याने अंतिम दिवशी शक्तिप्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजीची भावना होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी पक्षाचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर सतीश चव्हाण यांनी प्रचारात प्रथमच सहभाग नोंदवला. वैजापूर गंगापूर तालुक्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी चिकटगावकर तर शिक्षक, पदवीधर आणि प्राध्यापक वर्गासाठी चव्हाण यांनी बैठका घेतल्या. परस्परांच्या रणनीतीला शह देण्याच्या प्रयत्नांत शुक्रवारचा दिवस संपला अन् प्रचाराची मुदतही !
जवळपास१६ हजार मतदार असलेल्या सातारा वॉर्डातील प्रचार चमकदार आणि प्रभावी ठरला नसला तरी आकडेवारीच्या दृष्टीने सर्वात चुरशीची लढत येथेच पाहायला मिळत आहे. सातारा गाव पटेलनगरच्या मतदानावर उमेदवारांची भिस्त राहणार असून शुक्रवारी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी या भागावरच लक्ष केंद्रित केले होते.

खुल्या वर्गासाठी सुटलेल्या देवळाई वॉर्डाकडे सर्वच प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले. मात्र, सातारा वॉर्डातील प्रचाराची धुरा उमेदवार स्थानिक कार्यकर्त्यांवरच पडली. त्यामुळेच वॉर्डातील राजकीय वातावरण ढवळून निघाले नाही. परंतु, तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी शुक्रवारचा अखेरचा मुहूर्त साधत सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली. अखेरच्या दिवशीचा प्रचारात स्थानिक तरुण उमेदवार या प्रमुख मुद्द्यांवरच भर देण्यात आला. काँग्रेस भाजपच्या उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी नाही. तसेच शिवसेना काँग्रेसने दोन तरुण महिला उमेदवार दिल्याने मतदारांत याच मुद्द्यांबाबत चर्चा होती. सेनेने बाहेरचा उमेदवार दिल्याने भाजपने स्थानिक उमेदवाराची निवड करून शेवटच्या दिवसापर्यंत स्थानिक उमेदवार या एकाच मुद्द्यावर भर दिला. भाजप सेनेसाठी शहरातून फौज आलेली असताना काँग्रेसने स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या साहाय्याने प्रचार सुरू ठेवला. शुक्रवारच्या पदयात्रांसाठी पाच दिवसांपूर्वीच परवानगी घेतल्याने शुक्रवारी फक्त शिवसेनेनेच पदयात्रा काढत प्रचार केला.

असा झाला प्रचार
काँग्रेस,भाजपने रॅलीपेक्षा गुरुवारपर्यंत कॉर्नर बैठका घेण्यावर भर दिला. सेनेतर्फे पदयात्रा, छोटेखानी सभांचेच नियोजन होते. शुक्रवारी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचे नियोजन बदलले. काँग्रेसच्या उमेदवार सायली जमादार यांनी सकाळी सातपासूनच घरोघरी जाऊन प्रचार केला. पटेलनगर येथील मुस्लिम मतांवर काँग्रेसची भिस्त असून त्यासोबतच हायकोर्ट कॉलनी, पेशवेनगर, सातारा गावात जमादार यांनी प्रचार केला. सकाळी १० ते दुपारी पर्यंत संपूर्ण गाव परिसर सेनेने पिंजून काढला. दुसरीकडे भाजपच्या शहरातील काही पदाधिकारी साताऱ्यात दाखल झाले होते. परंतु भाजपतर्फे मात्र काही विशिष्ट घरांनाच भेटी देऊन ठरावीक मतदारांवर शुक्रवारी लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

आता खासगी सभांत खल
शुक्रवारी प्रचार संपल्यानंतर खासगी बैठका घेण्यात आल्या. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर कसे नियोजन करायचे, नेमक्या कोणत्या भागावर लक्ष द्यायचे, यावर खल झाला. उघडपणे होणारा प्रचार थांबला असला तरी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत जास्त मतदार असणारी कुटुंबे महत्त्वाची ठरणार असून त्यासाठी घराघरात बैठका होणार आहेत.

मूळ सातारावासी महत्त्वाचे
सातारा वॉर्डामध्ये रामकृष्ण आश्रमापुढील परिसर, पटेलनगर गाव असे एकूण जवळपास आठ हजार मतदार याच भागात आहेत. यातील जवळपास चार हजार मतदार मुस्लिम आहेत. उर्वरित मतदान हे तांडा सातारा परिसरात आहे. त्यामुळे साताऱ्यातील निवडणुकीत सातारा गाव, पटेलनगर तांडा महत्त्वाची भूमिका निभावतील, हे निश्चित आहे.